Monday, February 24, 2025
Home कॅलेंडर अखेर गुरूची शनाया गुपचूप अडकली लग्नबंधनात, १५ दिवसांनंतर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

अखेर गुरूची शनाया गुपचूप अडकली लग्नबंधनात, १५ दिवसांनंतर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

या वर्षी सिनेसृष्टीतून अनेक आनंदाच्या वार्ता समोर आल्या आहेत. काहीजण या वर्षी लग्नबंधनात अडकले आहेत. तर काहींच्या घरात या वर्षी नवीन पावलांचे आगमन झाले आहे. काहींनी थाटामाटात लग्न केले आहे, तर काहींनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा उरकला आहे. अशातच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनाया म्हणजेच रसिका सुनील ही विवाह बंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

रसिकाचा पती आदित्य बिलगी याने इंस्टाग्रामवर त्यांच्या लग्नातील फेरे घेताना एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो लांबून काढला आहे त्यामुळे त्या दोघांचाही चेहरा दिसत नाहीये. तसेच त्यांच्या आजूबाजूला मोजकीच माणसे दिसत आहेत. (Rasika sunil got married with her boyfriend aditya bilagi on goa beach)

हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “१८ ऑक्टोबर २०२१” त्यांनी गोव्याच्या किनारी लग्न केले आहे. या पोस्टवर अनेकजण त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. त्यांचे लग्न झालेले आता जवळपास १५ दिवस झाले आहेत. परंतु त्यांनी आता ही माहिती अधिकृत केली आहे. मागील काही दिवसापूर्वी रसिकाने गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील फोटोशूट आणि व्हिडिओ शेअर केले होते.

त्यामुळे त्यांचे आता प्रीवेडिंग फोटोशूट झाले आहे आणि लवकरच ते लग्न करतील असेच सगळ्यांना वाटत होते. परंतु तिने अचानक ही बातमी देऊन सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. त्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि जवळील काही मित्राच्या उपस्थितीत लग्न केले आहे. परंतु लग्नातील इतर फोटो अजून समोर आले नाही. या लग्नात कोण-कोण पाहुणे होते, तसेच कोण-कोणते कार्यक्रम झाले, हे बघण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-निलेश साबळेचा होणार पत्ता कट, ‘ही’ अभिनेत्री करणार ‘चला हवा येऊ द्या’चे सूत्रसंचालन?

-शिव ठाकरे अन् जुईली वैद्यच्या डान्सवर टायगर श्रॉफही झाला फिदा, कमेंट करत म्हणाला…

-भारीच की! ‘ही’ अभिनेत्री असणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री

हे देखील वाचा