Wednesday, June 26, 2024

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनायाने वाढवले सोशल मीडियाचे तापमान, फोटोंवर होतोय कमेंटचा वर्षाव

मराठी वाहिनीवर सुप्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मानावर राज्या केले आहे त्यासोबतच यामधील सगळ्यात जास्त गाजणारी भूमिका म्हणजे रसिका सुनिल उर्फ ‘शनाया‘. हिने आपल्या दमदार अभिनयाने या मालिकामध्ये बोल्ड अभिनेत्रीची भूमिका करत प्रेक्षकांवर वेगळीच छाप पाडली आहे. तिने नुकतंच सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर केले आहे, त्यामुळे अभिनेत्री खूपच चर्चेत आली आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे रसिका सुनिल (Rasika Sunil) हिला घराघरामध्ये ओळख मिळाली. मालिकामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार सगळ्यांनाच आवडला. मराठी मालिकामध्ये कादाचित ही पहिली भूमिका एवढ्या बोल्ड आवतारामध्ये दाखवली. पण अभिनेत्रीने आपले कपडे चांगल्या प्रकारे कॅरी केले त्यामुळे प्रेक्षकांना फार काही खटकले नाही. या मालिकेतून अभिनेत्रीने ब्रेक घऊन कोर्स पुर्ण करण्यासाठी परदेशात गेली त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. म्हणून पुन्हा एकदा शनायाच्या एन्ट्रीने मालिकेला नवीन वळन दिले आणि चाहत्यांनाही आनंद झाला.

अभिनेत्री टीव्हीसोबतच ओटीटी आणि चित्रपटामध्येही झळकत आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे चाहते देखिल तिच्या नवनवीन फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहात असतात. रसिका लग्नानंतर आपल्या पतीसोबतदेखिल रिल्स बनवत असून तुफान व्हायरल होत असतात. दोघांच्याही भन्नाट डान्सने चाहत्यांचे मनं जिंकली आहेत. रसिकाच्या सोशल मीडिया पोस्टची एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती सतत थीम बेस्ट पोस्ट करताना दिसते. तिने नवरात्री आणि दिवाळीच्या निमित्ताने तिने स्पेशल थीम फोटो शेअर केले होते. त्यावर चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. चाहत्यांनी कमेंटचा पाऊस करत तिला कोणी हॉट, कुणी गोड तर कुणी ब्लॅक ब्युटी असे नावे दिले होते.

 

View this post on Instagram

 

रसिका पुन्हा एकदा आपल्या बोल्ड लुकमुळे चर्चेत आली आहे. तिच्या एका फोटोने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. रसिका या फोटोंमध्ये अक्षरश: रेतीमध्ये लोळण घेतले आहे. त्या फोटोमध्ये तिने बिकनी परिधान केली असून ती सूपर हॉट दिसत आहे. निळ्या आभाळाखाली आरामामध्ये निर्गाचा आनंद लुटत आणि चेऱ्यावरच्या हास्याने अजून सौंदर्य फुलले आहे. रसिका…व्वा…निसर्गाचा आनंद घ्यावा तो असा इतक्या स्वच्छ मनानं अगदी मनसोक्तपणे… अश्या हटके शब्दात तिने कॅप्शन दिले आहे. तिच्या अशा फोटोंवर चाहत्यानी अनेक कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, “जलपरी”, “आग”, एका नागपुरकरने तर लिहिलंय “पोट्टी रेतीत लोळून राईली…बाप्पा…अन् हसून बी राईली…”

 

View this post on Instagram

 

अनेकांनी रसिकाच्या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री नेहा मालिकचा नवा लूक पाहिलात का?
खुशखबर! सात महिन्यातच देबीना बनर्जीने पुन्हा एकदा दिला चिमुरडीला जन्म

हे देखील वाचा