Friday, July 5, 2024

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अभिनय क्षेत्राला ठोकला रामराम? गावाकडे करतेय शेती

अभिनेत्री रतन राजपूत सध्या टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे. पण असे असले तरी सोशल मीडियावर मात्र ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. युट्यूबवरही ती अनेक व्हिडिओ शेअर करत असते. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती बिहारमधील आवाडी गावात फेरफटका मारत आहे.

या व्हिडिओत दिसते, तिने शेतातदेखील काही महिलांबरोबर वेळ घालवला आहे. तिने तिच्या व्हिडिओत असेही सांगितले की, ती महाराष्ट्रातील एका गावात राहिली असून गावाकडील आयुष्याबद्दल शिकण्यासाठी हळदीची आणि कांद्याची शेतीही केली. सध्या ती शूटपासून दूर असल्याने चाहते कयास लावत आहेत, की रतन अभिनय क्षेत्रातून दूर जात असावी.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा