Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

करवा चौथवर केलेल्या वक्तव्यावरून ट्रोल होतायेत रत्ना पाठक शाह; महिला म्हणाल्या, ‘लज्जास्पद विचार’

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) हिंदू सण करवा चौथवर केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. करवा चौथ हा विवाहित हिंदू महिलांनी दरवर्षी साजरा केला जाणारा एक दिवसीय सण आहे, ज्यामध्ये स्त्रिया सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

रत्ना पाठक शाह म्हणाल्या, “महिलांसाठी काहीही बदललेले नाही, किंवा काही क्षेत्रांमध्ये थोडे बदल झाले आहेत. आधुनिक सुशिक्षित स्त्रिया करवा चौथ करतात, हे भयावह नाही का? खरं तर? एकविसाव्या शतकात आपण असे बोलत आहोत? सुशिक्षित स्त्रियाही असं करतात.” (ratna pathak shah brutally trolled on commenting on karva chauth)

एका युजरने याची तुलना हिजाब परिधान करणाऱ्या मुस्लिम महिलांशी केली आणि ट्वीट केले की, “हिजाब परिधान करणाऱ्या आधुनिक महिलांना निवडीचे स्वातंत्र्य आहे, मात्र करवा चौथ करणाऱ्या आधुनिक महिला ‘भयानक’ आहेत.”

दुसरी म्हणाली, “मी करवा चौथ करते कारण मी एका स्वतंत्र देशात राहते, जिथे मी ज्या गोष्टींवर विश्वास ठेवते त्याचे अनुसरण करू शकते. मी एक आधुनिक स्त्री आहे, कारण मी इतरांना जज करत नाही. मी एक बुद्धिमान स्त्री देखील आहे. कारण मला माझे अधिकार माहित आहेत. ” दुसर्‍याने कमेंट केली, “किती लाजिरवाणे विचार, रोजा करणार्‍यांना हे सांगण्याची तुमची हिंमत आहे? हॅशटॅग-रत्ना पाठक शाह.” याशिवाय ट्विटरवर युजर्स ट्विट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

आपल्या स्पष्ट वक्तृत्वासाठी चर्चेत असते अभिनेत्री
रत्ना पाठक प्रत्येक मुद्द्यावर आपले विधान अगदी स्पष्टपणे मांडतात आणि यावेळीही त्यांनी काहीही विचार न करता आपले मत मांडले. तेव्हापासून लोक त्यांच्याविरोधात गेली. या मुलाखतीत रत्ना पाठक शाह पुढे म्हणाल्या, भारत हा एक पुराणमतवादी समाज बनत आहे. आगामी काळात आपला देश सौदी अरेबिया होईल असे वाटते. सौदी अरेबियात महिलांना किती वाव आहे? आपल्याला सौदी अरेबियासारखे व्हायचे आहे का?, असेही त्या म्हणाल्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा