Saturday, July 6, 2024

रवीना टंडनने नेहमीच केले स्वतःच्या अटींवर काम, न आवडणाऱ्या छोट्या सीनसाठी देखील तिने नाकारले सिनेमे

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने जेवढे सिनेमे केले ते सर्व तिच्या अटींवर केले. नुकतेच तिने एका मुलाखतीदरम्यान जुन्या सर्व गोष्टींना उजाळा दिला जेव्हा तिने स्विमिंग ड्रेस, घालायला, किस करायला नकार दिला होता. रवीनाने मुलखतीमध्ये सांगितले, “मी खूप जास्त गोष्टींपासून अनकॅम्फरटेबल होते. डान्स स्टेपमुळे देखील मी अनेकदा अनकॅम्फरटेबल झाली आहे. मी या गोष्टी थेट सांगायची. मी स्विमिंग ड्रेस घालायला, किस करायला सरळ सरळ नकार दिला.” 

पुढे रवीना म्हणाली, “मला एक रेप सीन करायचा होता, मात्र मी दिग्दर्शकाला सांगितले की माझ्या अंगावरचा एकही कापड फाटणार नसेल तरच मी हा सीन करेल. तेव्हा ते मला गर्विष्ठ म्हणायचे. ‘डर’ सिनेमा माझ्याकडे आला होता. हा सिनेमा वल्गर नव्हता मात्र यात असणाऱ्या काही सीनसोबत मी कंफेरटेबल नव्हती. मी कधी स्वामिंग कॉस्चुम नव्हता घातला. त्यामुळे मी सांगायची मी घालणार नाही. करिश्मा कपूरने पदार्पण केलेला प्रेमकैदी हा सिनेमा माझ्याकडे आला होता, मात्र यात एक सीन होता ज्यात हिरो चेन खाली खेचतो आणि स्ट्रेप दिसते. या सीनमुळे मी सिनेमाला नकार दिला.”

मुलाखतीमध्ये पुढे रवीनाने बॉडीशेमिंगवर देखील भाष्य केले. ती म्हणाली, “पुरुष कलाकार जे सांगायचे तो शेवटचा शब्द असायचा. स्त्रीच स्त्रीची सर्वात मोठी आणि खराब शत्रू असते. एखादीला कमी लेखण्यासाठी त्याच जास्त बॉडी-शेम्ड, स्लट-शेम्ड करतात. ९० च्या दशकात मी पत्रकारितेवर नाराज होऊन ब्रेक देखील घेतला आणि फिल्म डिस्ट्रिब्युटर असणाऱ्या अनिल थडानीसोबत लग्न केले.”

रवीनाबद्दल सांगायचे झाले तर तिने सलमान खानसोबत १९९१ साली ‘पत्थर के फुल’मधून पदार्पण केले. ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिने ओळख मिळवली. रवीनाने ‘मोहरा’, ‘अंदाज़ अपना अपना’, ‘लाडला’, ‘बड़े मियां छोटे मियां’, ‘दुल्हे राजा’ सोबत अनेक हिट सिनेमे दिले. रवीनाने ‘अरण्यक’मधून ओटीटीवर पदार्पण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रीदेवी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चीनमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार त्यांचा ‘हा’ सुपरहिट सिनेमा
ऐश्वर्यावाला सुंदरतेमध्ये मात देणारी ‘सिर्फ तुम’ फेम अभिनेत्री आहे तरी कुठे? जाणून घ्याच

हे देखील वाचा