Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड ‘तुझंच कायमचं व्हायचंय’, लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविनाने पोस्ट केले ‘ते’ न पाहिलेले फोटो

‘तुझंच कायमचं व्हायचंय’, लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविनाने पोस्ट केले ‘ते’ न पाहिलेले फोटो

अभिनेत्री रवीना टंडनची गणना ‘एव्हरग्रीन’ बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये केली जाते. रवीनाने आतापर्यंत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या प्रदीर्घ चित्रपट प्रवासामध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, ज्या आजही रुपेरी पडद्यावर हिट मानल्या जातात.

बॉलिवूडची ‘मस्त-मस्त गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रवीनाने नुकताच लग्नाचा 17 वा वाढदिवस साजरा केला आहे. तिने 2004 साली अनिल थडानीशी लग्न केले होते आणि आता 17 वर्षांनंतरही या जोडप्याचे प्रेम अबाधित आहे. रवीनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर या खास दिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. सर्व फोटोंमध्ये ती पती अनिलसोबत वेगवेगळ्या ठिकाणी दिसली आहे. यातील काही फोटो रवीनाच्या लग्नाचेही आहेत.

रवीनाने हे फोटो शेअर करत लिहिले की, “आजची आणि कायमची साथ. बरेच आयुष्य तुमच्याबरोबर तुमची बनून घालवायचे आहे.” रवीनाचे हे फोटो सोशल मीडियावर हेडलाईन बनवत आहेत. चाहत्यांनाही या दोघांची केमिस्ट्री बरीच आवडते. आतापर्यंत रवीनाच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.

तसेच, अनिलचे रविनासोबत हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने नताशा सिप्पीशी लग्न केले होते, जे जास्त काळ टिकू शकले नाही. त्याचवेळी अक्षयसोबतच्या ब्रेकअपमुळे रवीनाचेही हृदय पूर्णपणे तुटले होते. मग तिच्या आयुष्यात
अनिल आला. अनिलने रवीनाच्या वाढदिवशी तिला लग्नासाठी प्रपोज केले होते आणि रवीनाही त्याला हो म्हणाली. तेव्हापासून हे जोडपे पूर्णपणे एकमेकांच्या प्रेमात मग्न आहेत.

Photo Courtesy Instagramofficialraveenatandon

कामाबद्दल बोलायचे झाले, तर रवीना टंडनच्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात एकदम जबरदस्त झाली. तिचा पहिला चित्रपट हिट ठरला होता, यासाठी तिला फिल्मफेअरचा पदार्पण पुरस्कारही देण्यात आला होता. त्यानंतर ती ‘मोहरा’, ‘दिलवाले’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली. अ‍ॅक्शन थ्रिलर असो, रोमान्स असो किंवा कॉमेडी असो, रवीनाने तिच्या चित्रपट कारकिर्दीत सर्व प्रकारच्या भूमिका अगदी उत्तमरीत्या साकारल्या. तसेच, रवीना लवकरच संजय दत्त आणि यश सोबत एका चित्रपटात दिसणार आहे.

हे देखील वाचा