Friday, July 5, 2024

‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट

बॉलिवूडमधील अभिनेत्री रवीना टंडन नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी शेअर करत असते. रवीनाने बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वच लोकांना वेड लावले होते. आजही रवीना बॉलिवूडमध्ये सक्रिय असून, ती काही दिवसांपूर्वीच सुपरहिट अशा केजीएफ चॅप्टर २ मध्ये झळकली होती. नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे, सोशल मीडिया पोस्टमुळे, अपिरियन्समुळे चर्चेत असणारी रवीना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

आता पुन्हा एकदा रवीना तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. नुकतीच रवीनाने तिच्या मुलीबद्दल राशाबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. राशाने तिचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण केला असून, याच पार्श्वभूमीवर तिने ही एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच करण जोहरला पालकाच्या भूमिकेत पाहून झालेला आनंद देखील शेअर केला आहे. रवीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो पोस्ट करत लिहिले, “२०२३ च्या वर्गाला निरोप देत आहोत. प्रत्येक आई-वडिलांसाठी आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे हा एक अतिशय भावूक आणि आनंदाचा क्षण असतो. मुलं आता घरट्यातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. मुलं किती मोठी झाली आहेत.” या पोस्टसोबत तिने तिच्या दोन्ही मुलांसोबतच पती अनिल थडानीचा सोबतचा फोटो शेअर केला आहे.

रवीनाने तिच्या अजून एका पोस्टमध्ये करण जोहरबद्दल लिहिताना म्हटले, “करण जोहरला पालकाच्या भूमिकेत बघणे खूपच छान होते. शाळेचा नवीन पालक एन्जॉय करण.” या पोस्टवर करण जोहरने हार्ट ईमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.”

तत्पूर्वी रवीनाने २००४ साली निर्माते असलेल्या अनिल थडानीशी राजस्थानमध्ये लग्न केले. त्यानंतर तिला राशा आणि रणबीर ही दोन मुले आहेत. याशिवाय रवीनाने पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा