Saturday, June 29, 2024

रवी किशन यांच्या सिनेसृष्टीतील अंमली पदार्थांवरील ‘त्या’ वक्तव्यावरून जया बच्चन यांनी त्यांना सुनावले होते खडेबोल

बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे राजकारणात देखील सक्रिय आहेत. काही खासदार, आमदार सुद्धा आहेत. यातलेच काही कलाकार हे संसदेमध्ये असतात. अशाच काही कलाकारांपैकी जया बच्चन आणि रवी किशन हे आहेत. जया बच्चन नेहमीच त्याच्या अभिनयापेक्षा त्यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे आणि राजकारणातील वावरामुळे प्रकाशझोतात येतात. २०२१ साली रवी किशन यांनी संसदेतमध्ये सिनेसृष्टीतील अं’मली पदार्थावर भाष्य केले होते. या वक्तव्यानंतर जया बच्चन त्यांच्यावर भडकल्या होत्या. मात्र आता रवी किशन यांनी त्यावर स्पष्टीकरण देत त्यांच्या विधानाला चुकीचे घेतले असल्याचे सांगितले.

नुकतेच रवी किशन एका शोमध्ये गेले होते तिथे त्यांनी या प्रकरणावर बाजू मांडत सांगितले, “जया मॅमने माझा प्रश्नच ऐकला नाही. मी त्यांना एका आईसारखाच सन्मान देतो. मी आजही त्यांचा नमस्कार करतो. मी म्हटले होते, एक अभिनेता म्हणून की आपल्याला या अंमली पदार्थांपासून स्वतःला वाचवले पाहिजे जे या फिल्म इंडस्ट्रीमध्ये येत आहेत. मी पंजाबमधून येणाऱ्या अंमली पदार्थांबद्दल बोलत होतो, मात्र त्यांनी चुकीचा अर्थ घेतला.”

रवी किशन यांच्या व्यक्तव्याची आठवण काढत जया बच्चन यांनी म्हटले होते की, “फक्त काही मोजक्या लोकांमुळे तुम्ही संपूर्ण सिनेसृष्टीला कलंकित नाही करू शकत. मला खरंच खूप लाजिरवाणे वाटत आहे की, लोकसभेतील एक, जे इंडस्ट्रीमधून आहे. चित्रपटसृष्टीच्या विरोधात बोलत आहे. जिथे काम करतात त्याच जागेला नाव ठेवतात. मी त्या लोकांना अजिबात समर्थन देत नाही जे चित्रपटसृष्टीच्या विरोधात आहेत आणि जे या क्षेत्राला गटर म्हणतात.” त्यावेळी अभिनेत्री कंगना रणौतने सिनेसृष्टीला गटर म्हटले होते.

दरम्यान हा संपूर्ण वाद अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरु झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या काही चाचण्यांमध्ये स्पष्ट झाले होते की त्याला अंमली पदार्थ सेवनाची सवय लागली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY: विक्रांत मैसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्ही शोमध्ये निभावल्या आहेत मनोरंजक भूमिका
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज

हे देखील वाचा