बाॅलिवूड कलाकारांप्रमाणेच भोजपूरी कलाकार देखील प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात असतात. भोजपूरी इंडस्ट्रीतील मनोज तिवारीपासून ते रवी किशनपर्यत या सर्व कलाकारांनी प्रचंड प्रगती केली आहे. त्यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. मात्र, विवाह करताना अनेकांनी वेगळा मार्ग निवडला. यांनी इंडस्ट्रीतील अभिनेत्रींसोबत लग्न केले नाही. अनेक भोजपूरी अभिनेत्यांच्या पत्नी डाॅक्टर किंवा गृहिणी आहेत.
मनोज तिवारी
भोजपूरी इंडस्ट्रीमधून राजकारणात एन्ट्री करणारे भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांचं नाव इंडस्ट्रीत आदाराने घेतले जाते. मनोज तिवारी यांनी दुसरं लग्न केलं आहे. ३० डिसेंबर २०२०रोजी मनोज तिवारी यांनी दुसरं लग्न केले. लाॅकडाऊनमध्ये मनोज यांनी सुरभी यांच्याशी लग्न केले. सुरभी भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका आहेत.
रवी किशन
रवी किशन यांना कोण ओळखत नाही? भोजपूरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणजे रवी किशन होय. त्यांनी २०१९मध्ये लोकसभा निवडणुकीतून राजकारणात प्रवेश केला. ते उत्तरप्रदेशच्या गोरखपूर मतदानसंघातून खासदार म्हणून निवडून आले. रवी किशन म्हणतात, “आज मी ज्या यशाच्या शिखरावर आहे, त्याचे श्रेय फक्त माझ्या पत्नीला जाते.” त्यांच्या पत्नीचे नाव प्रिती आहे. प्रिती यांना एकदम साधं राहायला आवडतं आणि त्या प्रसिद्धीपासून दूर राहतात.
खेसारी लाल यादव
भोजपूरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता म्हणजे खेसारी लाल यादव होय. त्याचे लग्न चंदा देवीशी झाले आहे. खेसारी आणि चंदा देवी यांचे लग्न ११जून २००६ रोजी झाले. त्यांना आता दोन मुले आहेत. मुलीचे नाव क्रिती आहे, तर मुलाचे नाव ऋषभ आहे. त्यांची मुलगी क्रितीने भोजपूरी इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. प्रचंड वाईट काळात तोंड देऊन खेसारीने इंडस्ट्रीत यश मिळवले आहे.
पवन सिंग
भोजपूरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता पवन सिंग याचे लग्न ज्योती सिंगशी झाले आहे. ज्योती आणि पवन यांनी हिंदू पद्धतीने लग्न केले. ज्योती एक फॅशन डिझायनर आहे. पवनचे ज्योतीशी हे दुसरे लग्न आहे. त्यांच्या लग्नाला नातेवाईकांसह मित्रपरिवारही उपस्थित होता. पवनने ७०हुन अधिक चित्रपटात काम केले आणि १००हुन आधिक अल्बमसाठी गाणी गायली आहेत.
रितेश पांडे
भोजपूरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि गायक रितेश पांडेने आपल्या सुंदर आवाजाने अनेक चाहत्यांची मने जिंकली. त्याचे लग्न वैशाली पांडेशी झाले आहे. वैशाली डाॅक्टर आहे. त्यांनी लाॅकडाऊन दरम्यान लग्नं केले. त्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन साध्या पध्दतीने लग्न केले.
त्यांच्या लग्नाला कुटुंबातील सर्व व्यक्ती उपस्थित होते.