Tuesday, April 7, 2026
Home भोजपूरी सुभी शर्माच्या बहिणीच्या लग्नात रवी किशनने लावले जोरदार ठुमके, चाहत्यांनी दिली व्हिडीओला जोरदार पसंती

सुभी शर्माच्या बहिणीच्या लग्नात रवी किशनने लावले जोरदार ठुमके, चाहत्यांनी दिली व्हिडीओला जोरदार पसंती

जेव्हापासून अभिनेता किशन याने राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्याने भोजपुरी चित्रपटांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. एकेकाळी भोजपुरी चित्रपटसृष्टीचा स्टार मानला जाणार रवी किशन हा आजकाल लोकांच्या सेवेत भलताच वेळ घालवत आहे.

भोजपुरीची प्रसिद्ध अभिनेत्री सुभी शर्मा हिने नुकतेच तिच्या बहिणीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सुभीच्या बहिणीचे लग्न राजस्थान मधील जयपूर शहरात झाले. या लग्नात भोजपुरी सिनेसृष्टीच्या अनेक मोठमोठ्या चेहऱ्यांनी हजेरी लावली होती, ज्यात रवी किशनचा देखील समावेश होता. सुभीने रवी किशन लग्नाला आल्याबद्दल आभार मानत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या लग्नात रवी किशनने जोरदार डान्स केला होता.

१६ फेब्रुवारी रोजी मंगळवारी सुभीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोट केली होती, ज्यात रवी किशन फोटो व्यतिरिक्त व्हिडिओमध्ये देखील दिसला होता. या व्हिडिओमध्ये तो सुभी शर्मासोबत एका भोजपुरी गाण्यावर नाचताना दिसत आहे. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रवी किशनच्या डान्सचे चाहते कौतूक करत आहे. या व्हिडीओमध्ये लांब दाढी आणि मोठ्या केसांसाहित रवी किशन हा एका वेगळ्याच अवतारात दिसत होता.

सुभीने या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, ” माझ्या बहिणीचे लग्न अधिक संस्मरणीय बनविण्यासाठी रवी किशनजी तुमचे आभार मानते.”

सुभीने आपल्या बहिणीच्या हळदी समारंभातील फोटो देखील सोशल मिडियावर पोस्ट केले होते.

रवी किशन यांचा जन्म १७ जुलै १९७१ ला झाला असून त्यांना बब्बू या नावाने ओळखले जाते. त्यांची पत्नी प्रीती हिच्याशी पहिली भेट अकरावीमध्ये झाली होती आणि त्यांनतर त्यांनी विवाह केला होता. सन १९९० मध्ये किशन आपले घर सोडून मायानगरी मुंबईला आले, त्यावेळी त्यांना आईने फक्त ५०० रुपये त्यांच्या हातावर टेकवले होते.  आज ते आपल्या एका चित्रपटासाठी  पन्नास लाखांच्यावर रक्कम मोजतात. मुंबईच्या गोरेगाव परिसरात त्यांचे स्वतःचे घर आहे. त्यांना चार अपत्ये आहेत, त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.

याशिवाय भोजपुरी अभिनेत्री सुभी शर्मा ही तिच्या गाण्यांमूळे युट्युबवर खूपच चर्चेत असते. तिचे नृत्यदेखील तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. तिचा ‘बहुते हसीन राजा” हे गाणं युट्युबवर मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालत आहे.

हे देखील वाचा