Thursday, November 21, 2024
Home अन्य अधुरी प्रेम कहानी! क्रिकेटपटू आणि बॉलीवूड तारकांच्या पुर्ण न झालेल्या लव्हस्टोरी; कुणी दिला धोका तर कुणी….

अधुरी प्रेम कहानी! क्रिकेटपटू आणि बॉलीवूड तारकांच्या पुर्ण न झालेल्या लव्हस्टोरी; कुणी दिला धोका तर कुणी….

बॉलिवूड आणि क्रिकेटच्या जगात रोजच काहीतरी वेगळं ऐकायला मिळत असते. प्रसिद्धीच्या बाबतीत ही दोन्हीपण क्षेत्रे तोडीस तोड आहेत. म्हणून का जाणे आधीपासूनच या दोन्ही क्षेत्राचे नाते वेगळेच राहिले आहे. बॉलीवूड अभिनेत्री व क्रिकेटपटू यांच्यात आजपर्यंत अनेक वेळा प्रेमाच्या गोष्टी समोर आहे. काही पुढे गेल्या तर काही नंतर विभक्त झाल्या.

नगमा-सौरव गांगुली
सन २००० मध्ये बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नगमा आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यातील अफेअरविषयी बर्‍याच बातम्या आल्या. मात्र, सौरभ आणि नगना दोघेही त्यांच्या नात्याबद्दल कधीच माध्यमांशी काहीच बोलले नाहीत. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, त्यांनी लग्नदेखील केले होते. परंतू पुढे ते कधीच एकत्र दिसले नाही.

रवी शास्त्री-अमृता सिंग
एक काळ असा होता की, बॉलिवूडच्या  प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग आणि क्रिकेट विश्वातले अष्टपैलू क्रिकेटर रवी शास्त्री यांचे प्रेमसंबंध सर्वत्र जगजाहीर होते. त्यावेळी शास्त्री हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते आणि अमृता या बॉलीवूडच्या सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक होत्या. हे संबंध फार काळ टिकू शकले नाही आणि हे दोघेही पुढे वेगळे झाले.

इमरान खान-झीनत अमान
पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान आणि बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांचे नावही ८०च्या दशकात चर्चेत आले होते. मीडिया रिपोर्टनुसार झीनत अमान यांची इम्रान यांच्याशी पहिली भेट पाकिस्तानात झाली होती आणि हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते, परंतु झीनत आणि इम्रान यांचे नातेही फार काळ टिकले नाही.

युवराज सिंग-किम शर्मा
एक काळ होता, जेव्हा युवराज आणि किम एकमेकांच्या प्रेमात प्रेमात बुडाले होते. इतकेच नाही तर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही मीडियामध्ये येत होत्या, पण अचानक किम आणि युवराजच्या ब्रेकअपने सर्वांना चकित केले होते आणि या गोड नात्याला पूर्णविराम मिळाला.

नीना गुप्ता- विवियन रिचर्ड्स
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचे फलंदाज विवियन रिचर्ड्स यांच्या नात्याबाबत माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती. ८० च्या दशकात विवियन रिचर्ड्स यांची टीम जेव्हा भारतात आली तेव्हा, दोघे प्रथम भेटले होते आणि प्रेमात पडले. निना आणि विवियन रिचर्ड्स यांना मसाबा गुप्ता नावाची एक मुलगी आहे. या दोघांनी कधीही लग्न केले नाही.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा