Friday, November 22, 2024
Home साऊथ सिनेमा सहाय्यक अभिनेता, दिग्दर्शक असा प्रवास करत रवी तेजाने मिळवले ‘सुपरस्टार’ हे बिरुद

सहाय्यक अभिनेता, दिग्दर्शक असा प्रवास करत रवी तेजाने मिळवले ‘सुपरस्टार’ हे बिरुद

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वच अभिनेत्यांची एक खास स्टाइल आणि ओळख आहे. त्या सर्व अभिनेत्यांची लोकप्रियता केवळ दक्षिण भारतासाठी मर्यादित न राहता संपूर्ण देशात किंबहुना जगात पसरली आहे. प्रत्येक अभिनेत्यांनी मोठ्या कष्टाने त्यांचे करियर घडवले आहे. या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे ‘रवी तेजा’. रवी तेजाने त्याच्या अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात मोठे नाव कमावले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ‘अमिताभ बच्चन’ म्हणून रवी तेजा ओळखला जातो. रवी तेजाची हटके स्टाइल हीच त्याची मोठी ओळख आहे. आज (26 जानेवारी) रवी तेजा त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.

 

View this post on Instagram

 

A post shared by RAVI TEJA (@raviteja_2628)

रवी तेजाने आतापर्यंत 60 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून, जवळपास सर्वच सिनेमे त्याचे सुपरडुपर हिट झाले आहे. रवीचा जन्म आंध्रप्रदेशमधील जगमपेट्टा येथे 26 जानेवारी1968 रोजी झाला. त्याचे पूर्ण नाव रविशंकर राजू भूपतिराजू असे आहे. त्याचे बालपणीचे जीवन अतिशय गरिबीत गेले. अभयसात रवीचे मन कधी रमलेच नाही. त्यानंतर 1988 मध्ये नोकरीच्या शोधात तो चेन्नईमध्ये आला. मात्र त्याला चांगले काम मिळालेच नाही. मग कोणीतरी त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. पुढे रवीने या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या करियरची सुरुवात 1990 साली आलेल्या ‘कर्तव्यम’ सिनेमातून केली. या सिनेमात त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका केली होती. मात्र या सिनेमानंतर त्याला काम मिळणे बंद झाले आणि तो छोट्या मोठ्या भूमिका करू लागला.

 

View this post on Instagram

 

A post shared by RAVI TEJA (@raviteja_2628)

रवी तेजाची 1996 हे साल त्याचे नशीब बदलावणारे ठरले. यावर्षी त्याची भेट कृष्ण वाम्सी यांच्याशी झाली. वाम्सी यांनी रवीला त्यांच्या ‘नेने पल्लदुथा’ सिनेमात सहायक दिग्दर्शक म्हणून काम दिले सोबतच सिनेमात छोटी भूमिका देखील दिली. वाम्सी हे रवी तेजाच्या कामामुळे खूपच प्रभावित झाले आणि त्याला त्यांच्या आगामी ‘सिंधुरम्’ सिनेमात मुख्य अभिनेत्याची भूमिका दिली. हा सिनेमा तुफान गाजला. शिवाय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर रवी तेजा तुफान हिट झाला. त्याला या सिनेमाने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by RAVI TEJA (@raviteja_2628)

दिग्दर्शक पुरी जग्गनाथ आणि रवी तेजा यांची जोडी तुफान हिट झाली. दोघांनी अनेक होत चित्रपट दिले. रवी तेजाच्या अनेक चित्रपटांचे हिंदीमध्ये रिमेक करण्यात आले. त्यात अक्षय कुमारचा ‘रावडी राठोड’, सलमान खानचा ‘किक’ या हिट चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर

VIDEO: अजय देवगनला भर कार्यक्रमात खेचत तब्बूने केलं किस, सोशल मीडियावर व्हिडिओचा कहर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा