पूर्वी सेक्स या विषयावर खुलेपणाने चर्चा होत नव्हती. तसेच, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रेम असणे गरजेचे मानले जाते. मात्र, आजच्या काळात सेक्सबद्दल खुलेपणाने चर्चा होत आहे. अशात ऑस्ट्रेलियाची एक टीव्ही रियॅलिटी स्टार बेलिंडा रिगियर हिने खळबळजनक खुलासा केला आहे, ज्याने सर्वांच्या पायाखालची जमीन सरकेल.
बेलिंडा ‘लव्ह’ रिगियर (Belinda Love Rygier) हिने सांगितले आहे की, ती 700पेक्षा अधिक पुरुषांसोबत संबंध ठेवले आहेत. तिचे आठवड्यातील सहा दिवस सेक्सच्या शोधात जायचे. यासोबतच तिने हेही स्पष्ट केले की, तिला तिच्या सेक्स ऍडिक्शन (Sex Addiction) याबद्दल कसलीही लाज वाटत नाही. ती पूर्वी जशी होती, तशी आता नाहीये.
View this post on Instagram
‘मला माहिती नव्हतं की, मी सेक्स ऍडिक्ट आहे’
बेलिंडा रिगियर हिने एका रेडिओ शोमध्ये बोलताना म्हटले की, “जोपर्यंत मी हे ठीक केले नाही, तोपर्यंत मला माहिती नव्हते की, मी सेक्स ऍडिक्ट आहे. संकटं ही माझ्या नात्यासोबत होती आणि मी पुरुषांना आकर्षित करत राहिले.” बेलिंडा आता लव्ह गुरू बनली आहे. तिला बरे होऊन आता 8 वर्षे झाली आहेत. यासोबतच ती 15 महिन्यांपासून कुणाशीही नात्यात नाहीये.
View this post on Instagram
बेलिंडाला 2017मध्ये आलेल्या ‘द बॅचलर’ या प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन शोमधून ओळख मिळाली होती. तिने तिच्या आयुष्यातील अशा काळाबद्दल सांगितले, जेव्हा आठवड्यातील सहा दिवस ती रोमान्ससाठी जोडीदाराच्या शोधात भटकायची. ‘यू आर ग्रब मेट’ या शोमध्ये 38 वर्षीय बेलिंडा म्हणाली की, “सर्वकाही ठीक झाल्यानंतर मला माझ्या समस्यांबद्दल समजले. सर्वात मोठी समस्या माझ्या नात्यासोबत झाला होता. मी वाईट पुरुषांच्या संगतीत होते.”
View this post on Instagram
बेलिंडाने 8 वर्षांपूर्वीच तिच्या लैंगिक व्यसनावर नियंत्रण मिळवले होते. यानंतर ती टीव्ही स्टारपासून थेट रिलेशनशिप गुरू बनली. ती म्हणाली की, “बरी झाल्यानंतर मला याची जाणीव झाली की, काही जुन्या जखमांमुळे मला सेक्सचे व्यसन लागले होते.” पुढे बोलताना ती म्हणाली की, तिला आठवतही नाही की, तिने आतापर्यंत किती पुरुषांसोबत संबंध ठेवले आहेत. बेलिंडाने सांगितले की, ही संख्या ‘700 पेक्षा जास्त’ असेल. मात्र, तिने म्हटले की, तिला या आकड्याची अजिबात लाज वाटत नाही.
View this post on Instagram
सेक्सबद्दल समाज ढासळतोय
बेलिंडाने सांगितले की, “मला ज्या गोष्टी ऐकायच्या होत्या, त्याच गोष्टी पुरुष मला बोलत होते. ते लोक याबाबतीत खूप चांगले आहेत. सेक्सपेक्षाही जास्त हे सुंदर भावना आणि प्रेमाच्या नावावर होते.” तिने शेवटी सांगितले की, “समाज ढासळतोय. आपण चुकीच्या अर्थाने सेक्सचा वापर करतोय, जे क्षणिक सुख आहे. मला ज्याच्यासोबत चांगले वाटेल, त्याच व्यक्तीसोबत मी खास क्षण घालवेल.”
टीव्ही स्टार आणि लव्ह गुरू बेलिंडा हिने केलेल्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एवढ्यात गरिबाची चारचाकी येईल! मिया खलिफाने महागड्या ड्रेसमध्ये लचकवली कंबर, पाहून तुमचीही उडेल झोप
‘अभिनेत्रीशी लग्न केल्याचा परिणाम’, विराटच्या डिप्रेशनवर केआरकेचे धक्कादायक वक्तव्य; ट्वीटही केले डिलीट
‘मला कशाचीही पर्वा नाही…’, 24 वर्षांचा संसार मोडत स्पष्टच बोलली सोहेल खानची एक्स पत्नी










