Wednesday, July 2, 2025
Home साऊथ सिनेमा कन्नप्पाने टाकले ‘मा’ आणि ‘सितारे जमीन पर’ला मागे; पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई…

कन्नप्पाने टाकले ‘मा’ आणि ‘सितारे जमीन पर’ला मागे; पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई…

दक्षिणेतील अभिनेता विष्णू मंचूचा ‘कन्नप्पा‘ हा चित्रपट या वर्षीच्या सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट २७ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे जिथे त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी कन्नप्पाने बॉक्स ऑफिसवरील इतर चित्रपटांना बाजूला केले आणि दमदार ओपनिंग करण्यात यश मिळवले.

कन्नप्पाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. सॅकॅनिल्कच्या वृत्तानुसार, विष्णू मंचूच्या पौराणिक चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९ कोटी रुपये कमावले आहेत. यासह, चित्रपटाने काजोलच्या ‘मा’ आणि ‘सितारे जमीन पर’ला मागे टाकले आहे.

कन्नप्पाने बॉक्स ऑफिसवर काजोलच्या ‘मा’ या हॉरर चित्रपटाचा सामना केला आहे. हे दोन्ही चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित झाले होते. कन्नप्पाने ९ कोटी रुपयांची ओपनिंग केली असली तरी ‘मा’ त्याच्या अर्ध्याच कमाई करू शकला आहे. काजोलच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी फक्त ४.५० कोटी रुपये कमावले आहेत. कन्नप्पाने आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’लाही मागे टाकले आहे. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाने (दुसरा शुक्रवार) ६.५० कोटी रुपये कमावले आहेत.

मुकेश कुमार सिंग दिग्दर्शित ‘कन्नप्पा’ हा चित्रपट मोहन बाबू यांनी निर्मित केला आहे. विष्णू मंचू अभिनित या चित्रपटात मोहनलाल, अक्षय कुमार, प्रभास, प्रीती मुकुंदन, काजल अग्रवाल, मोहन बाबू, आर. सारथकुमार आणि मधु यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘कन्नप्पा’च्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट २०० कोटी खर्चून बनवण्यात आला आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

शेफाली जरीवालाच्या वॉचमनने केला धक्कादायक खुलासा; रात्री एक वाजता एक काळ्या रंगाची गाडी…

हे देखील वाचा