Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड एव्हरग्रीन अभिनेत्री असलेल्या रेखा यांना अभिनयात नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते करिअर

एव्हरग्रीन अभिनेत्री असलेल्या रेखा यांना अभिनयात नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते करिअर

बॉलिवूडच्या 100 वर्षांपेक्षा जास्तीच्या इतिहासात अनेक मोठमोठ्या, दिग्गज आणि सुंदर अभिनेत्री होऊन गेल्या. ज्यांच्या सुंदरतेची, अभिनयाची आणि चित्रपटांची चर्चा आजही माध्यमांमध्ये होत असते. या सर्व अभिनेत्रींमध्ये एव्हरग्रीन आणि अतिशय सुंदर अशा रेखा यांचे बात काही औरच आहे. रेखा यांनी त्यांच्या अभिनयाने, त्यांच्या सुंदरतेने आणि त्याच्या सदाबहार नृत्याने सर्वच पिढीतील प्रेक्षकांची मने जिंकली. आजच्या पिढीसाठी रेखा त्यांच्या आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत सर्वात वरच असतात. आज आम्ही तुम्हाला रेखा यांच्याबद्दल एक जास्त कोणाला माहित नसलेली गोष्ट सांगणार आहोत.

रेखा यांनी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. आज जरी त्या चित्रपटांपासून लांब असल्या तरी त्यांची लोकप्रियता आणि क्रेझ यत्किंचितही कमी झालेली नाही. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम सिनेमे केले. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी राष्ट्रे पुरस्काराने देखील गौरवले गेले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात इतके काही मिळवले असूनही त्या कधीच सिनेमे मन लावून बघत नाही. त्या या क्षेत्रात नाईलाजास्तव आल्या होत्या. त्यांना दुसऱ्या क्षेत्रात करिअर करायचे होते मात्र केवळ मजबुरी म्हणून त्या इथे आल्या.

मनावरंजनविश्वाच्या या ग्लॅमर जगात तुफान नावलौकिक कमवणाऱ्या रेखा यांना अभिनेत्री नाही तर एक एयरहोस्टेस होऊन आकाशात झेप घ्यायची होती. अभिनयात येण्याचा त्यांचा दूरदूर पर्यंत कोणताच प्लॅन नव्हता. एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतः याबद्दल सांगितले होते. इच्छा नसूनही त्यांना कमी वयातच मनाविरुद्ध चित्रपटांमध्ये काम करावे लागले. ही बाब अतिशय कमी लोकांना माहित असेल.

एका मुलाखतीमध्ये रेखा यांनी सांगितले की, “कुलजीत पाल आणि शत्रुजीत पाल हे दोघे एका अभिनेत्रीचा शोध घेत होते. ते त्यावेळीस मद्रास अर्थात आताच्या चेन्नईमध्ये आले होते. त्यांना कोणीतरी सांगितले की, दाक्षिणात्य मुलगी आहे. थोडी हिंदी बोलू शकते. मात्र मला हिंदी येत नव्हते. ते दोघं मला भेटायला आले आणि माझ्या आई जवळ गेले. त्यांनी मला विचारले की, ‘तुला हिंदी येते का?’ मी सांगितले ‘नाही’ त्यावर ते म्हणाले, ‘तुला हिंदी चित्रपटांमध्ये काम करायचे आहे का?’ मी म्हटले ‘नाही’ त्यावर ते म्हणाले, ‘ठीक आहे आम्ही उद्या येऊन तुम्हाला साईन करून घेतो.’ मला वाटते की या क्षेत्रात येणे माझ्या नशिबातच होते. तसे मी इथे आली.” रेखा यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या करिअरचे सुरुवातीचे ६/७ वर्ष अजिबात चांगले नव्हते. मात्र त्यांच्या आईवडिलांची इच्छा असल्याने आणि त्यावेळी घरातली परिस्थिती देखील नाजूक असल्याने मनाविरुद्ध त्यांना या क्षेत्रात यावे लागले.

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा