Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड ‘सदाबहार’ अभिनेत्री रेखा यांचा ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ गाण्यावर अप्रतिम डान्स, पाहून जजही गेले भारावून

‘सदाबहार’ अभिनेत्री रेखा यांचा ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ गाण्यावर अप्रतिम डान्स, पाहून जजही गेले भारावून

सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्या सौंदर्याचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे. अलीकडेच ट्विटरवर रेखा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या बॉलिवूडमधील क्लासिक गाणे ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’ वर नाचताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये रेखा यांनी जांभळ्या आणि सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे. यामध्ये रेखा ‘इंडियन आयडल 12’ च्या सेटवर स्पर्धकांसोबत कव्वालीच्या काही डान्स स्टेप्स करतानाही दिसत आहेत. त्यांचा डान्स पाहून सेटवर बसलेली जज नेहा कक्कर आणि तेथील सर्व स्पर्धकही भारावून गेले. इतकेच नव्हे, तर तेही त्यांच्याबरोबर नाचू लागले.

याव्यतिरिक्त, रेखा यांनी नेहा कक्करला ‘इंडियन आयडल 12’ मध्ये कांजीवरम साडी भेट केली. यावर नेहा म्हणाली, “ही साडी मला रेखा मॅमकडून मिळालेला आशीर्वाद आहे आणि ती नेहमीच माझ्यासाठी खूप खास असेल. प्रत्येकजण रेखा मॅमसाठी वेडा आहे आणि मीही त्यापैकीच एक आहे. त्यांना भेटून त्यांच्याकडून भेटवस्तू मिळणे मला खूप विशेष वाटते. मी माझ्या आनंदाचे वर्णन शब्दात करू शकत नाही.” खरं तर रेखा यांनी नेहाला तिच्या लग्नाचा शगुन दिला आहे.

रेखा यांचा हा व्हिडिओ पाहून, त्यांच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट्स व लाईक्सचा पाऊस पाडला आहे. बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन आहे, जे खूप कमी लोकांना माहित आहे.

रेखा या बॉलिवूडच्या प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांच्या लूकमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. 40 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘सिलसिला’, ‘नागिन’, ‘खूबसुरत’, ‘खून भरी मांग’, ‘उमराव जान’ यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जॉनी लिव्हरच्या मुलीने केला अक्षय कुमारच्या गाण्यावर जोरदार डान्स, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

हे देखील वाचा