बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांनी बॉलिवूडमध्ये केवळ त्यांच्या शानदार अभिनयाने नाही, तर त्यांच्या सुरेल आवाजाने देखील सर्वत्र आपले नाव कमावले आहे. आजही त्या कोणत्याही समारंभाला गेल्या, तर तेथील वातावरण आनंदित करून टाकतात. नुकत्याच त्या सोनी टीव्हीवरील इंडियन आयडल 12 या रियॅलिटी शोमध्ये गेल्या होत्या. या एपिसोडची एक झलक या शोचे जज विशाल दादलानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.
विशाल दादलानी यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते रेखा यांच्यासोबत मस्ती करताना दिसत आहेत. या फोटोला पाहूनच ही गोष्ट लक्षात येत आहे की, हा एपिसोड किती मजेदार असणार आहे. का नाही असणार? रेखाजी जिथेही जातात तिथे आपल्या अदाकारीने आणि स्टाईलने सगळ्यांना दीवाना बनवत असतात. तसेच तेथील वातावरण देखील हलकं- फुलकं करून टाकतात. या शोमध्ये रेखाजी इंडियन आयडल 12 च्या स्पर्धकांसोबत तबला वाजवताना देखील दिसत आहेत.
विशाल यांनी रेखा यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत रेखाजी त्यांच्या डोक्यावर तबला वाजवताना दिसत आहेत आणि यावर विशाल दादलानी मोठमोठ्याने हसत आहे. ते त्यांच्या डोक्यावर हात ठेवून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे.
नेहमी प्रमाणेच रेखा या शोमध्ये साडी नेसून आल्या होत्या. त्यांनी गुलाबी आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती. तसेच सगळा साज शृंगार केला होता. विशाल यांनी सांगितले की, “रेखाजी जेव्हा माझ्या डोक्यावर तबला वाजवण्यासाठी उभ्या राहिल्या, तेव्हा मी खूपच हैराण झालो.” हा फोटो बघून एपिसोड खूप मजेदार असणार आहे याचा अंदाज येत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया