बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, काजोल, शाहरुख खान आणि ऋतिक रोशन यांसारखे दिग्गज कलाकार झळकले होते. मात्र या चित्रपटात काम केलेल्या चाइल्ड आर्टिस्ट्सनीही प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली होती. चित्रपटात एकूण चार बालकलाकार होते. शाहरुख खानच्या बालपणीची भूमिका त्यांचा मुलगा आर्यन खानने साकारली होती, शाहरुखच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका जिब्रान खानने केली होती, जॉनी लीव्हरच्या मुलाच्या भूमिकेत त्यांचा खरा मुलगा जैसी लीव्हर दिसला होता, तर ऋतिक रोशनच्या बालपणीच्या ‘रोहन’ उर्फ ‘लड्डू’ची भूमिका काविश मजूमदारने निभावली होती.
आज 25 वर्षांनंतर आर्यन खान, (Aryan Khan)जैसी लीव्हर आणि जिब्रान खान हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. जिब्रान खानने 2023 मध्ये ‘इश्क विश्क रिबाउंड’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र ऋतिक रोशनच्या बालपणीचा रोल करणारा काविश मजूमदार बराच काळ लाइमलाइटपासून दूर दिसतो. त्यामुळे चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, अखेर काविश मजूमदार आज कुठे आहे आणि आता कसा दिसतो?
‘कभी खुशी कभी गम’ रिलीज होऊन आता 25 वर्षे झाली आहेत. या काळात काविश मजूमदारचा लूक पूर्णपणे बदलला आहे. चित्रपटात गोल-मटोल चेहरा, निरागस भाव आणि गोड हसरा ‘लाडू’ प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. मात्र आता तो इतका बदलला आहे की अनेकांना त्याला ओळखणंही कठीण जातं.
काविशने अभिनय क्षेत्राला पूर्णविराम दिलेला नाही. ‘कभी खुशी कभी गम’नंतर तो वरुण धवन आणि इलियाना डिक्रूज स्टारर ‘मैं तेरा हीरो’ या चित्रपटात दिसला होता. तसेच ‘गौरी तेरे प्यार में’ या चित्रपटात त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. याशिवाय रितेश देशमुखच्या ‘बँकचोर’ चित्रपटातही तो झळकला होता, जरी त्याची भूमिका फारशी चर्चेत आली नाही. काविशला प्रामुख्याने कॉमिक भूमिका साकारायला आवडतात. तो आजही थिएटरशी जोडलेला आहे आणि नियमितपणे ऑडिशन्स देत आहे. अभिनय क्षेत्रात पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे.
काविश मजूमदार सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही. इन्स्टाग्रामवर त्याला सुमारे 6,800 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. वरुण धवन आणि साक्षी धोनी यांसारखी प्रसिद्ध नावं त्याला फॉलो करतात. आतापर्यंत त्याने मोजक्याच पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यात त्याचे वेगवेगळे लूक आणि वैयक्तिक क्षण पाहायला मिळतात. जरी काविश मजूमदार आज मोठ्या पडद्यावर कमी दिसत असला, तरी तो अजूनही अभिनयाच्या दुनियेशी जोडलेला आहे आणि आपली स्वप्नं जिवंत ठेवत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
गोवा वेकेशनमध्ये कार्तिक आर्यनसोबत कोण होती? पण फॅन्सना ही सापडली मिस्ट्री गर्ल










