Monday, July 1, 2024

रेमो डिसूजाने पत्नी लिजेलसोबत केला मजेशीर व्हिडिओ शूट, पाहून तुम्हीही खदखदून हसाल

कोरोना काळात कलाकार आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. दिग्गज चित्रपट दिग्दर्शक आणि बॉलिवूड नृत्यदिग्दर्शक (कोरिओग्राफर) रेमो डिसूजा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. त्याच्या नृत्यशैलीवर चाहते कायमच प्रेम करत आले आहेत. आपल्या उत्तम कामगिरीने त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित गोष्टी रेमो बर्‍याचदा शेअर करत असतो. याव्यतिरिक्त पत्नीबरोबर इंस्टा रील्सही शेअर करत असतो. अलीकडेच त्याने एक गमतीशीर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी लिजेल देखील त्याच्यासोबत दिसली आहे.

व्हिडिओमध्ये रेमो डिसूजा आणि त्याची पत्नी एकत्र बसून त्यांचे स्मार्टफोन बघताना दिसत आहेत. रेमोला त्याच्या फोनमध्ये काहीतरी मनोरंजक वाटते, आणि तो त्याच्या पत्नीला दाखवतो. परंतु, लिजेल रेमोचा फोन घेते, आणि त्याच्या फोनमधील प्रत्येक गोष्ट तपासण्यास सुरुवात करते. त्यामुळे रेमो तिथून उठून निघून जातो.

हा व्हिडिओ शेअर करताना रेमोने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा तुम्हाला तुमच्या फोनमध्ये आपल्या पत्नीला काहीतरी दाखवायचे असते, पण तिला तुमच्या फोनमधील प्रत्येक गोष्ट तपासायची असते.’ या व्हिडिओला ३ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेक युजर्सनी कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले की, ‘काळ कसा बदलला आहे.’

दुसर्‍या युजरने लिहिले, ‘तुम्ही दोघे नेहमीच आम्हाला हसण्यासाठी कारणे देता.’ या व्यतिरिक्त इतर सर्व युजर्सने कमेंट बॉक्समधील इमोजीद्वारे आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत.

रेमो डिसूजाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, योग्य ते उपचार घेत तो या गंभीर आजारातून सुखरूप बाहेर पडला आहे, आणि आपल्या ‘डान्स दीवाने ३’ च्या सेटवर परतला आहे. त्याला सेटवर परत बघून सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

-याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा