Monday, July 1, 2024

आपल्या लावणीने आख्खा महाराष्ट्र गाजवणारी गौतमी पाटील झळकणार रुपेरी पडद्यावर, सिनेमाचं नाव पण ठरलं

सांस्कृतीक कलांपैकी लावणी हे महाराष्ट्राराज्याचं प्रसिद्ध नृत्य आहे. मात्र, सध्या लावणी नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्यात येत आहे. पूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी प्रसिद्ध लावणी कलाकर म्हणून ओळखली जाणारी गौतमी पाटील ही सतत तिच्या अश्लील लावणीमुळे चर्चेत असते. त्यामुळे अनेक लावणी कलाकारांनी गौतमीवर संतापही व्यक्त केला आहे. एवढे असूनही आता गौतमी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

प्रसिद्ध लावणीकार गौतमी पाटील (Gautami Patil) आपल्या धमाकेदार नृत्यानं आणि दिलफेक अदाकारिने अनेक तरुनांना प्रेमात पाडणारी गौतमी लवकरच चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. सतत वादामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधनारी लावणी कलाकार गौतमी हिला काही दिवसांपूर्वी चित्रपटामध्ये काम करण्याची ऑफर मिळाली आहे. तिच्या आगामी योणाऱ्या चित्रपटाचं ‘घुंगरु’ असं नाव आहे.

 

View this post on Instagram

 

त्याशिवाय गौतमीने तिच्या चाहत्यांनी आव्हान देत म्हाणली की, “माझा घुंगरु नावाचा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका नेमकी काय आहे हे मी आता सांगणार नाही. तुम्ही स्वत: चित्रपटगृहात या आणि तो पाहा. या चित्रपटातून आम्ही कलाकार आणि लोककलावंत यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या चित्रपटाचं शूटींग सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल. पण हा चित्रपट नक्की पाहावा”

 

View this post on Instagram

 

अनेक दिवासंपासून गौतमीचे नाव सतत वादामध्ये घेतले जाते. ती लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करते असे अनेकांनी आरोप केले होते. गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यामध्ये तिने एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंगावर पाणी ओतून, विभत्स हावभाव करून नाचताना दिसत होती. यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला असून लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आयएमडीबी टॉप 10 भारतीय चित्रपटांमध्ये फक्त एका बॉलिवूड चित्रपटाचा समावेश, पाहा यादी
Bye Bye 2022 । बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसाठी हे वर्ष ठरलं खूपच वाईट, काहींनी केली जेलवारी

हे देखील वाचा