Saturday, June 29, 2024

सपना चौधरीला टक्कर देत, हरियाणवी गायिका रेणुका पंवार घेऊन आली नवं गाणं! पाहा व्हिडिओ

म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पंजाबी गाणी आणि संगीताला महत्त्वपूर्ण स्थान आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये तर या गाण्यांचा दबदबा आहे. पण या सर्वांमध्ये आता हरियाणवी संगीतही झपाट्याने प्रगती करत असून चाहत्यांनाही ते आवडू लागले आहे. सुप्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीनंतर, आता आणखी एक नाव इंडस्ट्रीत चर्चेत आहे. ते नाव म्हणजे रेणुका पंवार. जिने तिचे नवे गाणे रिलीज करून सोशल मीडियावर धमाल केली आहे. रेणुका पंवारचे नवीन गाणे तूफान व्हायरल होत आहे.

रेणुका पंवार ही सध्या हरियाणवी म्युजिक इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय होताना दिसत आहे. तिची गाणी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत आणि चांगला व्यवसायही करत आहेत. यूट्यूबवर देखील तिची गाणी ट्रेंड होत असतात. आता रेणुकाच्या ‘तोड लाई मटकी’ या नवीन हरियाणवी गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. हे गाणे इतके लोकप्रिय होत आहे की, ती आता प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीशी स्पर्धा करताना दिसत आहे.

रेणुकाचे ‘तोड लाई मटकी’ हे नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. गाण्याच्या जोरदार बीट्सवरील जबरदस्त डान्स मुव्हजने प्रेक्षकांना हादरून ठेवले आहे. या गाण्याने सर्वांची मने जिंकली आहेत आणि त्याला गाण्याला चांगले व्ह्यूजही मिळाले आहेत. यासह, रेणुका स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे.

हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर, एका आठवड्यातच गाण्याला 1.4 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे, तर गाण्याचे व्ह्यूज सतत वाढतही आहेत. गोरी नागोरी आणि कुलदीप कैशिक यांनी आपल्या कौशल्याने गाण्याला चांगलाच तडका लावला आहे. पवन गिलच्या दिग्दर्शनाखाली रेणुका पवार आणि अमित धुल यांनी या नवीन हरियाणवी गाण्याला आवाज दिला आहे. तसेच, अँडी दहियाने गाणे लिहिले आहे, तर जीआर म्युझिकने याला संगीत दिले आहे.

‘तोड लाई मटकी’मध्ये मटकीसाठी डान्स करणार्‍या गोरी नागोरीबद्दल बोलायचे झाले, तर ती वेगाने प्रसिद्धीच्या झोतात येत असलेली हरियाणवी संगीत उद्योगातील कलाकार आहे. तिचे कामही चांगलेच पसंत केले जात आहे. विशेषत: संगीताच्या सूरासह लावलेल्या तिच्या ठुमक्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लाज वाटू दे ताई’, निया शर्माच्या बोल्ड डान्स व्हिडिओवर युजर्सची प्रतिक्रिया

-श्श्श्श! स्वप्निल जोशी अभिनित ‘बळी’ चित्रपटाचा टिझर रिलीझ, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

-गदरमध्ये ज्याने सनी-अमिषाच्या मुलाची भूमिका केली आता तोच होणार गदर दोनचा हिरो, पाहा कोण आहे ‘तो’

हे देखील वाचा