Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

हरियाणवी गायिका रेणुका पवारच्या गाण्याने वाढवला यूट्यूबचा पारा, व्हिडिओत दिसतेय एकदम कडक

हरियाणवी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायिका रेणूका‌ पवार ही एकानंतर एक अशी जबरदस्त गाणी घेऊन येत आहे. तिची सगळी गाणी प्रदर्शित होता क्षणीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचे परिंदा हे गाणे काही तासांपूर्वी यूट्यूबवर रिलीझ झाले आहे. या गाण्याला यूट्यूबवर खूपच पसंती मिळताना दिसत आहे.

हे गाणे रेणुका पवार, केडी आणि अनिषा पांडे यांच्यावर चित्रीत केले आहे. या गाण्यात अनिशा पांडे आणि रेणुका पवार खूपच सुंदर दिसत आहेत. या गाण्यात त्या दोघीही हरियाणवी ड्रेसमध्ये दिसत आहेत. या गाण्याला आतापर्यंत 14 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ‘बिट्टू सोरखी’ यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे. तसेच क्षितिज गुप्ता हे या गाण्याचे निर्माते आहेत.

नुकतेच रेणुका पवार हिचे आणखी एक गाणे रिलीझ झाले आहे. ‘रेल मे धक्के लागे’ हे या गाण्याचे बोल आहेत. तिच्या या गाण्याला देखील प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्याला आतापर्यंत 25 लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याआधी रेणुका पवार हिचे ’52 गज का दामण’ या गाण्याने यूट्यूबवर रेकॉर्ड बनवला आहे. हे गाणे खूपच सुपरहिट झाले आहे. गाण्याला आतापर्यंत 752 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. रेणुका पवार हिचे कोणतेही गाणे रिलीझ झाल्यावर हिट होते.

रेणुका पवार हिने या आधी देखील हरियाणवीमधील डान्सर आणि सुपरस्टार सपना चौधरी हिच्यासोबत अनेक हिट गाणी दिली आहेत. तिचे सपना चौधरीसोबत ‘छम्मक छल्लो’ हे गाणे रिलीझ झाले होते. या गाण्याला 81 लाखपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. रेणुका पवार हिने हरियाणवी संगीत क्षेत्रात तिची एक वेगळीच ओळख बनवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

-‘खूप भारी दिसतेय’, हिना खानच्या समुद्रावरील ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची कमेंट

-हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक

हे देखील वाचा