भारतामध्ये सर्वत्र 74 वा प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष मोठ्या उत्साहाने साजरी करत आहेत. रथामध्ये ठिक ठिकानी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. दरवर्षी प्रमाने यावर्षी देखिल दिल्लीमध्ये कर्तव्यपथ म्हणजेच तिन्ही सैन्यदलाकडून परेड सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विशेष बाब म्हणजेच यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाची देखिल निवड करण्यात आली असून मराठमोळ्या संगितकाराने हा कर्तव्यपथ गाजवताना पाहायला मिळालं.
भारताच्या 74 व्यास प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कार्यक्रमा मोठ्या जल्लोषात साजरी केली जातात. अशातच यांदाच्या दिल्लीमधील कर्तव्यरथामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथावर मराठी संगीतकार कौशल इनामदार (Kaushal Inamdar) यांचं संगीत ऐकायला मिळालं असू महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्यासाठी ही खूपच मोठी कौतुकाची बाब आहे. कौशल इनामदार यांनी स्वत: ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
कौशल यांनी ट्वीट शेअर करत रथाचा फोटो शेअर करत लिहिले की, “महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घडवणाऱ्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा चित्ररथ पाहायला मिळत आहे. त्यात तुम्हाला माझे संगीत पाहायला मिळत आहे. ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण मी माझ्या मित्रांशिवाय हे करु शकलो नसतो. अमित पाध्ये, अनिल करंजवकर, सिद्धेश जाधव, नंदेश उमप, गायिका अमृता खोडके-दहिवेलकर, प्रगती जोशी, मधुरा परांजपे आणि विवेक कांबळी यांचे मनापासून आभार.”
Tableau of Maharashtra on #RepublicDay parade today. Based on "ShaktiPeeth". Maharashtra will showcase 3 & half Shaktipeeths. These 3 & half Shaktipeeths include Mahalakshmi Temple of #Kolhapur, Sri Kshetra Tuljapur of Tuljabhavani, Renukadevi of Mahur & Saptshringi Devi of Vani pic.twitter.com/6Qlnh23bFq
— Dayanand Kamble (@dayakamPR) January 26, 2023
प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षीप्रमाने राजधानी दिल्ली कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. असून यामध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध संगितकार कौशल इनमदार यांच्या गायनाने तेथील उपस्थित सैनिकांना अणि मान्यवरांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. “महाराष्ट्रामधील ‘साडेतीन शक्तीपिठ’ आणि नारी शक्ती” या संक्लपनावर आधिरित ही चित्ररथ सादर करण्यात आले आहेत, ज्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या राथामध्ये भारतामधील अनेक महापुरुषांचे मोठ मोठे स्माjकही दाखवण्यात आले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाद कार पण…! शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई
अथिया शेट्टीचा नमस्कार करताना दिसला अहान शेट्टी, फोटो पोस्ट करत म्हणाला…