काही वर्षांपूर्वी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात रेशम टिपणीस आणि राजेश श्रृंगारपुरे ही जोडी चांगलीच गाजली होती. त्यांच्यातील नात्याचीही खूप चर्चा झालेली. आता पुन्हा एकदा ही जोडी छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
सोनीटीव्हीवर सुरु असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या मालिकेतून रेशम छोट्या पडद्यावर बऱ्याच दिवसांनी पुनरागमन करत आहे. ती या मालिकेत द्वारकाबाई होळकर हे पात्र साकारणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत राजेश आधीपासूनच मल्हारराव होळकर हे पात्र साकारत आहे. त्यामुळे आता चाहत्यांना पुन्हा एकदा रेशम आणि राजेश यांना एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)