Tuesday, July 9, 2024

मालिकेत साधी दिसणारी दीपा खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, व्हिडिओ आला समोर

रंग माझा वेगळा‘ ही टेलिव्हिजनवरील एक चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. मालिकेची कहाणी वर्णभेदावर आधारित आहे. मालिकेत रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. मालिकेची कहाणी सगळ्यांना खूप आवडते. मालिकेत सध्या अनेक रंजक अशी वळणं येत आहेत. मालिकेत रेश्माचा रंग सावळा दाखवला आहे. मालिकेत अत्यंत साधी दिसणारी रेश्मा वैयक्तिक आयुष्यात मात्र चांगलीच ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. या व्हिडिओमध्ये ती रस्त्यावरून चालत येताना दिसत आहे. व्हिडिओच्या बॅकग्रांउडला ‘मेरा यार’ हे गाणे लागले आहे. व्हिडिओमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने केवळ ईमोजी पोस्ट केली आहे. (reshma shinde share her glamrous video on social media)

तिने शेअर केलेला हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “आई शपथ लय भारी दिसतेस” तसेच बाकी अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपा आणि कार्तिक हे एकमेकांपासून दुरावले आहेत, तर आयशाला आता कार्तिकसोबत लग्न करायचे आहे. त्यामुळे ती गेले ६ वर्ष कार्तिकची वाट बघत आहे. त्यामुळे ती आता कार्तिक आणि दीपाचा घटस्फोट व्हावा यासाठी ती पूर्ण प्रयत्न करत आहे.

या मालिकेत रेश्मा शिंदे आणि आशुतोष गोखले हे मुख्य भूमिकेत आहेत. या व्यतिरिक्त हर्षदा खानविलकर, अनघा भागरे, अंबर गणपुळे हे कलाकार आहेत. रेश्माने या आधी ‘लगोरी’, ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘केशरी नंदन’ या मालिकामध्ये काम केले आहे. परंतु तिचे ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा नावाचे पात्र चांगलेच गाजले आहे. अनेकांना तिचे हे पात्र खूप आवडत आहे.

हेही वाचा :

पतीसोबत सोनाली कुलकर्णीने धरला ‘बुरूम बुरूम’ गाण्यावर ठेका, चाहता म्हणतोय, ‘दाजी जरा हळू’

‘ज्या’ भूमिकेने गौरव खन्नाला केले टेलिव्हिजनवरील सर्वात मोठे स्टार, त्याच अनुज कपाडियाच्या भूमिकेला ‘या’ कलाकारांनी दिलाय नकार

‘कभी नीम नीम, कभी शहद शहद’, म्हणत सोनाली कुलकर्णीने केले रंगीबेरंगी साडीतील फोटो शेअर 

 

हे देखील वाचा