Saturday, March 15, 2025
Home मराठी रेश्मा शिंदेने केले अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या डायलॉगवर हावभाव, पाहून नॅशनल क्रश देखील वाटेल फिकी

रेश्मा शिंदेने केले अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या डायलॉगवर हावभाव, पाहून नॅशनल क्रश देखील वाटेल फिकी

आजच्या एकविसाव्या शतकात देखील आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात वर्णभेद केला जातो. अनेकवेळा अनेक ठिकाणी गोऱ्या रंगाच्या माणसांना आणि सावळ्या रंगाच्या माणसांना वेगळी वागणूक दिली जाते. या एका आगळ्या-वेगळ्या विषयावर भाष्य करणारी स्टार प्रवाहवर ‘रंग माझा वेगळा’ नावाची मालिका आहे. मागच्या वर्षी या मालिकेला सुरुवात झाली. एक वेगळी कहाणी घेऊन आलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला. अशातच मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

रेश्माने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तिने निळ्या रंगाची सुंदर अशी साडी आणि सलिव्ह लेस ब्लाऊज घातला आहे. तसेच केसांचा अंबाडा घातला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘पुष्पा’ या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या डायलॉगवर हावभाव करताना दिसत आहे. (Reshma shinde share video on social media)

हा व्हिडिओ करून तिने ‘फिल्मीपंती’ असे लिहिले आहे. तिचा हा सुंदर आणि गोड व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आहे. तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच ऋतुजा बागवे, माधव देवचक्के यांसारख्या कलाकारांनी देखील तिच्या या व्हिडिओवर हार्ट ईमोजी पोस्ट करून तिचे कौतुक केले आहे.

मालिकेत रेश्मा शिंदे आणि आशुतोष गोखले हे मुख्य भूमिकेत आहेत. या व्यतिरिक्त हर्षदा खानविलकर, अनघा भागरे, अंबर गणपुळे हे कलाकार आहेत. रेश्माने या आधी ‘लगोरी’, ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘केशरी नंदन’ या मालिकानमध्ये काम केले आहे. परंतु तिचे ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा नावाचे पात्र चांगलेच गाजले आहे. अनेकांना तिचे हे पात्र खूप आवडत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा