Friday, July 5, 2024

घटस्फोट होऊनही ‘ही’ अभिनेत्री झाली होती आई, सलमासोबत काम करण्यासाठी लपवली होती एवढी मोठी गोष्ट

साऊथ अभिनेत्री रेवतीचा (revathi) आज ५६ वा वाढदिवस आहे. ही तीच रेवती आहे जी सलमान खानसोबत (salman khan) ‘लव्ह’ (love) या चित्रपटात दिसली होती. रेवतीने जेव्हा लव्ह विथ सलमान हा चित्रपट केला होता, तेव्हा तिचे लग्न झाले होते. पण तिच्या करिअरला धक्का लागू नये म्हणून तिने ही गोष्ट गुप्त ठेवली होती. वास्तविक, त्यावेळी असे मानले जात होते की, जर अभिनेत्री विवाहित असेल तर तिचे करिअर संपले आहे. रेवतीने १९८६ मध्ये सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक सुरेश चंद्र मेननशी लग्न केले होते.

दोघांचे लग्न त्या काळातील सर्वात जास्त चर्चेत राहिले होते. असे देखील म्हटले जाते की, त्या दोघांची प्रेमकथा एखाद्या परीकथेपेक्षा कमी नव्हती, जरी त्यांचे सुंदर नाते जास्त काळ टिकू शकले नाही. काही काळानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला आणि २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

घटस्फोटानंतर रेवतीने चित्रपट जगतातून बराच ब्रेक घेतला. रेवतीने तिच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त तिच्या मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि ती आई बनल्याचे सांगितले तेव्हा चर्चेत आली. तिची पोस्ट सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी होती. तिने सांगितले की, त्याने आयव्हीएफद्वारे मुलीला जन्म दिला आहे कारण रेवतीचे स्वप्न आई बनण्याचे होते आणि तिने तिचे स्वप्न पूर्ण केले.

रेवती अभिनेत्रीसोबतच दिग्दर्शकही आहे. तिने मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. रेवतीला तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि ६ साऊथ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. ८० आणि ९० च्या दशकातील रेवती ही एकमेव दक्षिण अभिनेत्री होती जिने तमिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला होता. एवढेच नाही तर रेवती एक यशस्वी भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

खरंच! सारा-कार्तिक यांच्यात अफेअर? करण जोहरचा मोठा खुलासा

दिग्दर्शकाच्या ‘त्या’ बोलण्याने ढसाढसा रडली होती नोरा फतेही, इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय

दु:खद! ‘द गॉडफादर’ फेम अभिनेत्याचे निधन, ४ पत्नीपैकी एकीनेही नाही दिली आयुष्यभर साथ

हे देखील वाचा