अभिनेत्री रिया चक्रवर्ती तीन वर्षानंतर पुन्हा एकदा मनोरंजनविश्वात पुनरागमन करत आहे. रिया शेवटची २०२० साली आलेल्या ‘चेहरे’ या सिनेमात दिसली होती. आता लवकरच ती टीव्हीवर दिसणार आहे. ती एमटीव्ही रोडीजच्या गॅंगलीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल तिनेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.
तीन वर्षांनी कॅमेऱ्यासमोर जाणाऱ्या रियाने आनंद व्यक्त करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती शूटवर जाण्याआधी मेकअप करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती सांगते की,सेटवर येउन ती खूपच खुश असून तिला खूप छान वाटत आते. तीन वर्षांनी पुन्हा कामावर आल्याचा तिला आनंद आहे. बऱ्याच काळाने व्हॅनिटी व्हॅनमध्ये देखील तिला खूप नवीन वाटत होते. खास गोष्ट म्हणजे तीन वर्षांपूर्वीच त्याच सेटवर ती चेहरच्या शूटसाठी व्हॅनिटीमध्ये होती.
View this post on Instagram
हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “खूप जास्त वाट पाहावी लागली. सेटवर येते आणि कामावर परतणे याचा एक वेगळाच आनंद असतो. हा आनंद शब्दात सांगू शकत नाही. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. काळ खूप अवघड होता मात्र तुमचे प्रेम खरे होते. आनंदाश्रू येत आहेत.”
सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर रिया कायदयाच्या कचाट्यात अडकली होती. सुशांतच्या कुटुंबाने त्याच्या मृत्यूसाठी रियाला जबाबदार धरले. त्यानंतर तिला अटक कऱण्यात आली होती. मात्र आता तीन वर्षांनी तिचे आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रियाला पुन्हा कामावर आलेलं पाहून तिच्या फॅन्सने देखील तिचे स्वागत करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट यांचा अविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध फॅशन डिझायनरचे दुःखद निधन