Thursday, November 21, 2024
Home मराठी रिया आणि शौविक पुन्हा एकदा एनसीबी कार्यालयात हजर! पाहा कोण होतं सोबत

रिया आणि शौविक पुन्हा एकदा एनसीबी कार्यालयात हजर! पाहा कोण होतं सोबत

मागील वर्षी जून २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा त्याच्याच राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचं हे प्रकरण देशभरात गाजलं. राजकीय दृष्ट्या निवडणुकीचा एक वेगळाच रंग या प्रकरणाला लागला होता. मुंबई पोलीस, सीबीआय, ईडी, एनसीबी, बिहार पोलीस या सर्व संस्थांनी या प्रकरणाचा तपास केला परंतु सुशांतच्या मृत्यूचं खरं कारण कुणालाच सापडलं नाही. मग यात सुशांतची तत्कालीन प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर चौफेर टीका होऊ लागली. ड्रग्ज प्रकरणात ती व तिचा भाऊ या दोघांनाही अटक झाली. मात्र दोघांनाही काही महिन्यांपूर्वी जामिनावर सोडण्यात आलं होतं. असं असतानाही हे दोघेही पुन्हा एकदा एनसीबीच्या कार्यालायत जाताना दिसले. नेमकं काय प्रकरण आहे चला पाहुयात!

ड्रग्ज प्रकरणात तुरुंगवास भोगलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक दोघेही सोमवारी पुन्हा एकदा एनसीबी कार्यालयात पोहोचले. हे दोघेही त्यांचे वडील इंद्रजित चक्रवर्तीसमवेत कारने एनसीबी कार्यालयापर्यंत गेले होते. दोघेही हजेरी लावण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कार्यालयात पोहोचले होते. या दोघांची जामिनावर सुटका करत असताना कोर्टाने असा आदेश दिला होता की त्यांना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एनसीबी कार्यालयात हजर व्हावं लागेल.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) कार्यालयात सुमारे अर्धा तास घालविल्यानंतर दोघेही आपल्या गाडीमध्ये बसले आणि आपल्या घरी परतले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत १४ जून रोजी त्याच्या मुंबईतल्या घरी मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस, बिहार पोलिस, सीबीआय, ईडी आणि एनसीबी यांनी केला होता, परंतु अभिनेत्याच्या मृत्यूमागील खरं कारण काय हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र, तपासणी दरम्यान एनसीबीने बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेट उघडकीस आणलं आणि दीपिकासह अनेक अभिनेत्रींना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलवण्यात आलं होतं.

रिया आणि शौविक या बहीण भावाच्या जोडीला याच प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि रियाला एक महिना तुरुंगात राहावं लागलं होतं. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तीला जामीन मंजूर केला होता तर शौविकला तीन महिन्यांनंतर जामीन मंजूर केला होता. या दोघांना प्रत्येकी ५०,००० रुपयांच्या जात मुचलक्यावर सोडण्यात आलं. जामीन मंजूर करताना कोर्टाने म्हटलं होतं की त्यांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहावं लागेल.

मागील वर्षी म्हणजेच सुमारे ३ दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसले. ते नवं घर शोधत होते. रविवारीही रिया आणि शौविक हे सुद्धा घर शोधताना दिसले. चौकशी, तुरूंग आणि जामीन या सर्व प्रकरणानंतर हे दोघे भाऊ-बहिण पहिल्यांदाच एकत्र दिसले.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा