Saturday, June 29, 2024

‘बिग बॉस १५’ मध्ये रिया चक्रवर्तीची एन्ट्री? ‘या’ कलाकारांच्या नावाचीही चर्चा

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजेच ‘बिग बॉस’ होय. प्रेक्षक बेधुंद होऊन हा शो पाहत असतात. या शोचे आतापर्यंतचे सगळे भाग सुपरहिट ठरले आहेत. बिग बॉस प्रेमी शोची आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच त्यांच्यासाठी एक गोड बातमी आली आहे, ती म्हणजे ‘बिग बॉस 15’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस 14’ चा जेव्हा ग्रँड फिनाले होता, तेव्हा या शोचा होस्ट सलमान खान याने घोषणा केली होती की, पुढच्या सिझनमध्ये कलाकारांसोबत सामान्य नागरिक देखील दिसणार आहेत. बिग बॉस 15 बद्दल खूप चर्चा होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आणखी वाढत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, बिग बॉस 15 मध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती येऊ शकते. ई टाईम्सच्या मते, रिया स्पर्धक म्हणून बिग बॉस 15 मध्ये सामील होणार आहे. जर ती खरंच आली तर सुशांत सिंग राजपूत बाबत अनेक गोष्टी माहित होतील. रियासोबत अनुषा दांडेकर, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम दयाबेन म्हणजेच दिशा वकानी आणि पार्थ समथान यांच्याशीदेखील शोच्या निर्मात्यांनी चर्चा केली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, या शोची ऑडिशन प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यातच सुरू झाली आहे. 31 मे 2021 ही या शोच्या ऑडिशनची शेवटची तारीख होती. मागच्या वेळी पेक्षा त्यांना या वेळी शो चटपटीत आणि धमाकेदार बनवायचा आहे.

या शोचे ऑडिशन देण्यासाठी या स्टेप फॉलो करायच्या होत्या. तुम्हाला तुमचा एका व्हिडिओ शूट करून पाठवायचा होता. हा व्हिडिओ पाच मिनिटांपेक्षा जास्त आणि 50 एमबीपेक्षा जास्त नसला पाहिजे. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला वूट ऍप डाऊनलोड करावा लागणार होता. या सोबतच तुम्ही www.voot.com वर जाऊन देखील रजिस्ट्रेशन करता येत होते. या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये तुम्हाला काही तुमची माहिती भरावी लागणार होती जसे की, नाव, मोबाईल नंबर, ईमेल अड्रेस, ऑडिशन व्हिडिओ, तसेच तुमचे वय 18 पेक्षा जास्त असले पाहिजे ही देखील अट होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा