Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड नुकतीच लग्नबंधनात अडकलेली सोनम कपूरची बहीण मालदीवमध्ये करतेय मजा; स्विमिंग पूलमधील फोटो केला शेअर

नुकतीच लग्नबंधनात अडकलेली सोनम कपूरची बहीण मालदीवमध्ये करतेय मजा; स्विमिंग पूलमधील फोटो केला शेअर

प्रसिद्धीपासून दूर असलेली अभिनेता अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. अलीकडेच रियाने तिचा बॉयफ्रेंड करण बूलानीशी विवाह केला. विवाहानंतर रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. ती अनेकदा नवनवीन गोष्टी शेअर करताना दिसते. विवाहानंतर रिया सुट्टीसाठी मालदीवमध्ये गेली आहे. तसेच, तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर केले आहेत. नुकताच रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो केले आहे. यामध्ये ती स्विमिंग पुलमध्ये पोहताना दिसत आहे.

या फोटोत रिया स्विमिंग पूलमध्ये बिकिनी घालून एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर तिचा पती करण दूर उभा असलेलाही फोटोमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना रियाने लिहिले की, “मुलांना नानीच्या घरी सोडले आहे.”

रियाने दिलेल्या या कॅप्शननंतर युजर आश्चर्यचकित झाले आहेत आणि विचार करत आहेत की, रिया कोणत्या मुलांबद्दल बोलत आहे. त्याचवेळी, कमेंटमध्ये काही युजर्सनी असेही म्हटले की, “रियासाठी लहान मूल म्हणजे तिचा पाळीव कुत्र्याबाबत आहे.”

चाहत्यांसोबतच कलाकारही रियाच्या या फोटोवर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “तुमची काॅमेडी आश्चर्यकारक आहे.” रियाला ओळखणारे अनेक चाहते या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, चाहते आणि नेटिझन्स देखील त्यांचे शब्द बोलण्यात कुठे अपयशी ठरत नाहीत. काही लोकांनी हार्ट ईमोजी शेअर केल्या आहेत. रियाच्या या फोटोने सोशल मीडियावर आग लावली आहे.

दरम्यान, सोनम कपूरची बहीण रिया चित्रपट सृष्टीपासून दूर राहते, पण तिने चित्रपट निर्मितीमध्ये हात आजमावला आहे. रियाने तिच्या करिअरची सुरुवात ‘वेकअप सिड’ने केली होती. यामध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यानंतर, तिने २०१० मध्ये तिची मोठी बहीण सोनम कपूरचा चित्रपट ‘आयशा’ची निर्मिती केली. या चित्रपटानंतर तिने ‘खूबसूरत’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

चित्रपट निर्माती असण्याबरोबरच रिया एक उत्तम फॅशन डिझायनर देखील आहे. याशिवाय तिला व्यवसायाची खूप आवड आहे. रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायच झाल, तर गेल्या १० वर्षांपासून रिया करण बूलानीला डेट करत होती. ते नुकतेच आता विवाहबंधनात अडकले आहेत. ते अनेकदा एकत्र असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा