आपल्या दमदार अभिनयाने अनिल कपूर यांनी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत त्यांची मुलगी सोनम कपूरनेही अभिनयात चांगले यश मिळवले आहे. मात्र, अनिल कपूर यांची आणखी एक मुलगी आहे. तिचे नाव रिया कपूर आहे. रिया नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. रिया सध्या आपले वैवाहिक आयुष्याचा आनंद लुटत आहे. रियाने नुकतेच आपला पती करण बूलानीच्या वाढदिवशी कँडल लाईट डिनरचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
रियाने हा खास क्षण खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय केला आहे. ती या खास क्षणी आपल्या पतीवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोत दिसते की, करण पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये केक कापत आहे. दुसरीकडे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रिया जवळ उभी राहून करणच्या डोक्यावर किस करताना दिसत आहे. (Rhea Kapoor Kissing Photos Viral on Internet)
रिया आणि करण एकमेकांसोबत कँडल लाईट डिनरच्या रोमँटिक वातावरणात एकमेकांमध्ये हरवले आहे. तसेच ते एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत रियाने रोमँटिक कॅप्शन लिहून करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रियाने लग्नानंतर आपल्या पतीचा पहिला वाढदिवस राजस्थानच्या एका रिसॉर्टमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट निर्माती आणि फॅशन लाईन सहमालक रियाने आपल्या पतीच्या वाढदिवसाचे खास आयोजन केले होते.
रियाने हे फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहते आणि मित्रमंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. रियाच्या या पोस्टवर ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी लिहिले की, “कृपया माझ्याकडून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दे.” याव्यतिरिक्त अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. याव्यतिरिक्त करण बूलानीही आपल्या पत्नीच्या या अदावर फिदा झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बिग बॉसपेक्षा जास्त पैसे मी बाहेर राहून कमावू शकते, म्हणत ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीने धुडकावली ऑफर










