बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न लावून दिले आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरनंतर (Sonam Kapoor) यावर्षी ऑगस्टमध्येच त्यांनी त्यांची धाकटी मुलगी रिया कपूरचे (Rhea Kapoor) हात पिवळे करून निरोप दिला. रियाने करण बुलानीला आपला जोडीदार बनवले. १२ वर्षांच्या नात्याला नवे नाव देत त्यांनी अत्यंत साधेपणाने घरात लग्न केले. लग्नानंतर रियाने तिच्या आलिशान घराची आतील झलक चाहत्यांना दाखवली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिया आणि करण बुलानी यांनी मुंबईत स्वतःचे सुंदर घर बनवले आहे. रियाने तिच्या घराचे हे फोटो एका मॅगझिनसाठी काढली आहेत. रियाच्या या फोटोंमध्ये तिच्या पतीचाही समावेश आहे.
वोग मॅगझिनच्या कव्हरसाठी पोझ देताना दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. फोटो शेअर करताना रियाने करण बुलानीला टॅग केले आणि लिहिले की, “हे घर करणने आणि मी भाड्याने घेतले आहे, ज्यामध्ये आम्ही आमच्या कुत्र्यासोबत राहतो.”
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत रियाने सांगितले की, तिचे बालपणीचे घर आणि त्यातील सुखसोयी सोडणे सोपे नसते. तिने सांगितले की, “माझे घर अभयारण्य, मौजमजेचे ठिकाण, आराम आणि सुरक्षिततेचे ठिकाण असावे, असे मला नेहमीच वाटत होते. दोन मजल्यांमध्ये विभागलेले आमच्या अपार्टमेंटचे रुपांतर, आता एकाच इमारतीत झाले आहे.”
रिया म्हणाली की, हे स्पष्ट आहे की, लग्नाप्रमाणेच घरांमध्येही विविध संवेदना जोडण्याचा एक मार्ग आहे. रियाने सांगितले की, मास्टर बेडरूम ही घरातील तिची आवडती खोली आहे, ज्याला तपकिरी रंग देण्यात आला आहे. फोटो शेअर करताना तिने सांगितले की, “मला अशी खोली हवी आहे, ज्यामध्ये करणला स्वर्ग वाटेल, पण हे पाहून मी सर्व काही विसरते. मनीषा पारेख आणि कविता सिंग यांनी अशी सुंदर बेडरूम बनवली आहे.”
रियाने तिचा मित्र डिझायनर रवी वजीरानी याच्या मदतीने फॅशनची तिची आवड दाखवली आणि घराचा आतील भाग अशा प्रकारे बदलला. रियाने सांगितले की, तिने तिचे घर साध्या पद्धतीने सजवले आहे. ज्यात लाकडी आणि संगमरवरी फरशी आहेत. फुलांनी, कॅडिन्सने ते खूप सुंदर सजवले आहे.