कलर्स मराठी या वाहिनीवरील एका मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला.’ मालिका पाहून आता प्रेक्षकांचाच या मालिकेत जीव गुंतला आहे. मालिकेची कहाणी वेगळी आणि प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारी आहे. त्यामुळे मालिका सगळ्यांना भावत आहे. मालिकेत एका सामान्य घरातील मुलीची कहाणी दाखवली आहे. घरात कमवणारा कोणताही पुरुष नसताना ही मुलगी कॉलेज करता करता घराची जबाबदारी घेते. चार पैसे कमावता यावे म्हणून ती रिक्षा चालवते. खरंतर महिला आजकाल कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात आज त्या कार्यरत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे रिक्षाचालक. मालिकेत मुख्य भूमिकेत योगिता चव्हाण ही अभिनेत्री आहे. योगितासाठी एक खास व्यक्ती तिला भेटायला आली होती. ते तिच्यासाठी मस्त सरप्राईज होते.
मालिकेच्या सेटवर रिक्षा चालक रेखा दुधाने योगिताची भेट घ्यायला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी योगिताचे खूप कौतुक केले तसेच तिला तिच्या कामासाठी प्रोत्साहन दिले. त्यावेळी योगिता म्हणाली की, “रेखा दुधाणे महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक. त्या अचानक एक दिवस आम्हाला भेटायला ‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या सेटवर आल्या. जेव्हा त्या रूममध्ये आल्या तेव्हा त्यांची डॅशिंग व्यक्तिमत्व बघून मला शब्दच सुचले नाही. त्यांचा तो खाकी गणवेश आणि चेहर्यावरचं वेगळंचं तेज बघून मी स्तब्ध झाली. त्यांनी गोड अशी स्माईल देत, रिक्षाची चावी फिरवत रूममध्ये एंट्री केली. त्यांना समोर बघून अचानक अंतराचं भविष्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं.” (Rikshaw driver Rekha dudhane come to jeev maza juntala set to meet yogita Chavhan)
पुढे ती म्हणाली की, “मला माझ्यावर सोपावलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक प्रकर्षाने झाली. पण, या गोष्टीचा आनंद सुद्धा झाला की, मालिकेद्वारे आपण अशा एका व्यक्तिमत्वाचे प्रतिनिधीत्व करत आहोत. जेव्हा त्यांनी अंतराची स्तुती केली, तेव्हा मी कसेबसे माझे अश्रु आवरू शकले. त्या केवळ रिक्षाचालक नसून त्या नर्स देखील आहेत. रेखा ताईंनी आयुष्यात मुलगी, बहीण, बायको अशा अनेक जबाबदार्या पार पाडल्या आहेत. गेले तीसहून अधिक वर्ष नर्सिंग बरोबरच त्या रिक्षा चालवून संसाराला चांगलाच हातभार लावत आहेत. मला आशा आहे रेखा ताईंच्या आशीर्वादाने आणि तमाम महाराष्ट्राच्या असलेल्या प्रेमामुळे मी देखील अंतराच्या भूमिकेला न्याय देऊ शकेन.”
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत सध्या खूप मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत अनपेक्षितपणे अंतरा आणि मल्हारचे लग्न झाले असल्याने अंतराची हमसफर असणारी तिची रिक्षा तिच्यापासून दुरावली आहे. पण आता खानविलकरांच्या घरात गेल्यावर अंतरा पुन्हा रिक्षा चालवून तिच्या कुटुंबाला हातभार लावेल की नाही हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल
–बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम