आपल्या अभिनयाने सर्वांना अक्षरशः वेड लावणारी आणि खूप कमी वेळात प्रसिद्धीचे शिखर गाठणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. रिंकूला तिच्या रिंकू या नावापेक्षा आर्ची या नावाने सर्वत्र ओळखतात. कारण तिच्या सैराट या चित्रपटाने तिला एवढी ओळख निर्माण करून दिली की, तिला सर्वत्र चित्रपटातील नावानेच ओळखतात. रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे फॅन फॉलोविंग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तीचा कोणत्याही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. असाच एक फोटो रिंकूने पोस्ट केला आहे, जो वेगाने होताना दिसत आहे.
रिंकूने तिचा एक डॅशिंग फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे, या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि, तीने लाल रंगाचा टॉप, फिकट आकाशी रंगाची जीन्स आणि स्पोर्ट शूज परिधान केले आहेत. तसेच केस मोकळे सोडले आहेत. डोळ्यावर लावलेल्या तिच्या गॉगलने तिच्या व्यक्तिमत्त्वात आणखीनच भर घातली आहे.
https://www.instagram.com/p/CNtz-k1pWcb/
फोटोमध्ये ती धाकड गर्ल दिसत आहे. याधी देखील रिंकूने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. आणि या प्रत्येक फोटोला खूपच पसंती मिळाली आहे. तिने आता शेअर केलेल्या या फोटोला अगदी कमी वेळात एक लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. रिंकू राजगुरुने खूप कमी वयात एवढी लोकप्रियता मिळवली आहे.
https://www.instagram.com/p/CN1WVFDp26c/
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने सैराट या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी पेक्षाही जास्त बिजनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये धडक नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.










