सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे, सर्वांची लाडकी ‘आर्ची’. आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हल्ली इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वेळ घालवत असते. ती दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आगामी प्रोजेक्टबद्दल सर्वकाही चाहत्यासोबत शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात रिंकू कमालीची सुंदर दिसत आहे. यात तिने साडी नेसून पारंपारिक लूक केलेला दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, तिने यामध्ये जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. नाकात घातलेल्या नथीवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. यात तिने एकापेक्षा एक भन्नाट पोझ दिल्या आहेत, जे पाहून कोणीही तिच्यावरून नजर हटवू शकणार नाही. साडीमधील तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत. चाहते या फोटोवर कमेंट करून, आपले प्रेम व्यक्त करत आहे. (rinku rajguru gave wishes of new year)
नेहमीप्रमाणे तिच्या या फोटोलाही नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हे फोटो शेअर करून अभिनेत्रीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, “तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!” कमेंट करत एका चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. आतापर्यंत या फोटोवर २४ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.
आगामी काळात रिंकू ‘छूमंतर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा-