Tuesday, July 9, 2024

हिंदी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त रिंकूचा ‘बिहाइंड द सीन’ फोटो होतोय तूफान व्हायरल

‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर सर्वाधिक सक्रिय असते. या ठिकाणी तिला साडे चार लाखाहून अधिक युजर्स फॉलो करतात. तिचा हा भलामोठा चाहतावर्ग तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ती तितकी सक्रिय नसते. याचे कारण म्हणजे, ती तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग व्यस्त आहे.

नुकताच तिचा एक ‘बिहाइंड द सीन’ अर्थातच कॅमेऱ्याच्या मागचा फोटो समोर आला आहे. एका चित्रपटाच्या सेटवर क्लिक केलेल्या या फोटोमध्ये रिंकू खुर्ची बसलेली दिसत आहे. एवढेच नव्हे तर खुर्चीवर बसल्या बसल्या तिला झोप लागल्याचेही या फोटोमध्ये दिसत आहे. वास्तविक हा फोटो राजश्री मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रिंकूचा हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे की, “बिहाइंड द सीन. अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या एका हिंदी सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहे. रिंकूने हा BTS Photo share केला आणि सध्या hectic शूट सुरू असल्याचं सांगितलं.” तसेच रिंकुच्या चाहत्यांनी या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडल्याचे दिसून येत आहे. (rinku rajguru gurus behind the scene photo from set)

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने काही दिवसांपूर्वीच ‘छूमंतर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा आगामी चित्रपट लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कलाकारांनी व्यक्त केला शोक

-‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

-‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

हे देखील वाचा