Monday, July 1, 2024

‘सैराट’मधील आर्ची येणार नव्या कार्यक्रमातून भेटीला, प्रोमो ठरतोय चर्चेचा विषय

अभिनेत्री रिंकू राजगुरू ‘सैराट’ चित्रपटानंतर अनेक वेबसिरीजमध्ये दिसली. आता ती छोट्या पडद्यावरही येण्यास सज्ज आहे. झी मराठीने नुकतेच ‘बस बाई बस’ या नव्या शोची घोषणा केली आहे. या शोमध्ये रिंकू सेलिब्रेटी म्हणून सहभागी होणार आहे. या शोचा प्रोमोही सध्या चर्चेत आहे.

सुबोध भावे या शोमधून महिलांसाठी खास बस घेऊन येणार आहे, असं प्रोमोमधून दिसतंय. तसेच प्रोमोमध्ये असंही दिसलं की, बसमध्ये बसलेल्या अनेक स्त्रियांनी रिंकू आणि अभिनेत्री अल्का कुबलला प्रश्न विचारून भांडावून सोडले आहे. आता २९ जुलैपासून सुरू होणारा हा शो नक्की कसा असणार आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा