मराठी चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी कलाकारांना अहोरात्र कष्ट घ्यावे लागतात. दिवस रात्र मेहनत करून ते या चंदेरी दुनियेत प्रवेश करत असतात. पण काही कलाकार एकाच चित्रपटाने एवढे लोकप्रिय होतात की, भविष्यात जेव्हा केव्हा त्या चित्रपटाचा नाम उल्लेख केला जातो. तेव्हा त्या कलाकाराचे नाव समोर येते. असाच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अजरामर राहणारा चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’. एक वेगळाच विषय घेऊन आलेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात काय तर देशात गाजला होता. सोबतच या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी पात्रं देखील प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली होती. यात आर्ची या भूमिकेत असणाऱ्या रिंकू राजगुरूचा धाडसी अंदाज सगळ्या प्रेक्षकांना आवडला होता. हा रिंकूचा पहिलाच चित्रपट होता, पण या चित्रपटाने तिला यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले होते. आता रिंकू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रिंकूने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने हिरव्या रंगाचा लॉंग ड्रेस परिधान केला आहे. तसेच तिने डायमंडचे इअरिंग आणि ड्रेसला मॅचिंग हिरव्या रंगाची बोटात अंगठी घातली आहे. या सगळ्या लूकमध्ये तिचे डोळे खूपच आकर्षक आणि बोलके दिसत आहेत. त्यामुळे तिचा हा लूक चांगलाच ग्लॅमरस दिसत आहे.
हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की, “आपण बऱ्याच वेळा आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न करतो, पण आपले डोळे बोलत असतात ही गोष्ट आपण विसरून जातो.” तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. या फोटोवर सातत्याने लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. तिच्या या फोटोला आतापर्यँत ६४ हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. (rinku rajguru looks stunning in green long dress, photos get viral)
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त कमाई केली होती. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण
-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा
-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल