Tuesday, June 10, 2025
Home मराठी वेड लावणाऱ्या आर्चीच्या अदांनी चाहत्यांना घातली भुरळ, दिसतीये एकदम गोड

वेड लावणाऱ्या आर्चीच्या अदांनी चाहत्यांना घातली भुरळ, दिसतीये एकदम गोड

चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळाली आहे. प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत. अशीच एक आगळीवेगळी प्रेम कहाणी असलेला चित्रपट ज्याने मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते. तो चित्रपट म्हणजे ‘सैराट’.

या चित्रपटातून एक जोडी मात्र खूप लोकप्रिय झाली ती म्हणजे आर्ची आणि परश्या. ही पात्र अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी निभावली होती. या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. आजही या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. दोन्हीही कलाकार आज त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात व्यस्त आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने दिवाळी निमित्त अनेक फोटो शेअर केले होते. अशातच तिचा आणखी एक नवा लूक समोर आला आहे. (Rinku rajguru share her beautiful photos on social media)

https://www.instagram.com/p/CaRQP-Jpjxi/?utm_source=ig_web_copy_link

रिंकूने शेअर केलेल्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिने चोळी घातली आहे. कपाळाला छोटीशी टिकली लावून तिने केस बांधले आहेत. या फोटोमध्ये तिच्या अदा वेड लावणाऱ्या आहेत. चाहत्यांना देखील आर्चीचा हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. आपण पाहू शकतो की रिंकूने तिच्या लूकमध्ये फार बदल केला आहे. एक अभिनेत्री म्हणून असलेली कौशल्य ती अवगत करण्याचं प्रयत्न करत आहे. या फोटोला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त बिजनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन, आकाश ठोसरसोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा