Tuesday, December 3, 2024
Home अन्य “रिंकू ‘झिम्मा 2’ची मज्जा घालवणार नाही ना?” चाहत्याच्या कमेंटवर सिद्धार्थचे सडेतोड उत्तर; म्हणाला…

“रिंकू ‘झिम्मा 2’ची मज्जा घालवणार नाही ना?” चाहत्याच्या कमेंटवर सिद्धार्थचे सडेतोड उत्तर; म्हणाला…

20202मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा‘ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगले ठसे उमटवले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय करत होता. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ‘झिम्मा 2’ या चित्रपटाचे प्रदर्शन 24 नोव्हेंबरला होणार आहे.

या चित्रपटात पहिल्या भागातील कलाकारांसोबतच नवीन कलाकारांचीही एंट्री झाली आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती ऋषिकेश जोशी यांनी केली आहे. ‘झिम्मा 2‘ (Zimma 2) या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे यांची फोटो आहेत.

या पोस्टरवर एक डायलॉग आहे, “तीच मज्जा आहे दुसऱ्याही डावात. आईच्या नाही… आज्जीच्याही गावात!” ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची कथा काय असेल हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, या चित्रपटात पुन्हा एकदा सात मित्र मैत्रिणींच्या साहसाचा प्रवास पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचे पोस्ट पाहिल्यानंतर चाहते अनेक प्रश्न विचारात आहेत. हा चित्रपट चांगलाचा गाजत आहे. अनेक चाहते कमेंट करत विविध प्रश्न विचारताना दिसत आहेत. नुकतंच सिद्धार्थ चांदेकरच्या पोस्टरवरील पोस्टवर एकाने कमेंट केली आहे. “मी अजून प्रतीक्षा करु शकत नाही. मी आशा करतो की, रिंकू राजगुरु या चित्रपटाची मज्जा घालवणार नाही” त्याच्या या कमेंटला सिद्धार्थने उत्तर दिले आहे. तो म्हणाला की “नाही, असे अजिबात होणार नाही. तिने कडक काम केलं आहे.” त्याची ही कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे. (Rinku Rajguru won spoil the fun of Zimma 2 Siddharth Chandekar reaction to a fans comment)

आधिक वाचा-
सुरुवातीला लोकांच्या उलट्या साफ करायची रवीना टंडन, करिअरबद्दल केला हैराण करणारा खुलासा
निरागसता आणि निखळ सौंदर्य; मृण्मयी देशपांडेचे हे फोटो पाहिलेत?

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा