Thursday, June 26, 2025
Home मराठी अत्यंत साध्या आणि सोज्वळ अंदाजात रिंकू राजगुरूने केले फोटोशूट, चाहत्यांनी केला कमेंटचा वर्षाव

अत्यंत साध्या आणि सोज्वळ अंदाजात रिंकू राजगुरूने केले फोटोशूट, चाहत्यांनी केला कमेंटचा वर्षाव

आपल्या अभिनयाने सर्वांना अक्षरशः वेड लावणारी आणि खूप कमी वेळात प्रसिद्धीचे शिखर गाठणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. रिंकूला तिच्या ‘रिंकू’ या नावापेक्षा ‘आर्ची’ या नावाने सर्वत्र ओळखतात. कारण तिच्या सैराट या चित्रपटाने तिला एवढी ओळख निर्माण करून दिली. तिला सर्वत्र चित्रपटातील नावानेच ओळखतात. रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे फॅन फॉलोविंग देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तीचा कोणत्याही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. असाच एक फोटो रिंकूने पोस्ट केला आहे, जो वेगाने होताना दिसत आहे.

रिंकूने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. तिचा फोटो इतर पोस्टपेक्षा खूपच वेगळा आणि लक्षणीय आहे. त्यामुळे सगळ्यांचे या फोटोकडे लक्ष वेधले जात आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, रिंकू अत्यंत साधी आणि सोज्वळ दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. तिने जमिनीवर झोपून हे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये तिने अगदी हलकासा मेकअप केला आहे. गळ्यात मोहक असे गळ्यातले आणि कानात कुड्या घातल्या आहे. डोळ्यांवर आलेल्या छोट्याश्या केसाच्या बटिने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.

तिने हा फोटो शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “सिंपल.” तिचा हा साधा लूक पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून तिच्या या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक करत आहेत. यासोबत अभिनेत्री स्पृहा जोशी हिने देखील हार्ट ईमोजी पोस्ट करून रिंकूच्या या फोटोवर कमेंट केली आहे.

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी पेक्षाही जास्त बिजनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.

हे देखील वाचा