गेल्या अनेक दिवसापसून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि रिषभ पंत यांच्या नात्याच्या चर्चा सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असातात. अभिनेत्रीने कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केली की, त्याच्यामागे रिषभचे नाव जोडले जायचे. त्यामुळे अभिनेत्रीला जाम ट्रोलही केले जायचे मात्र, रिषभलाही त्याचा सामना करावा लागतो. पण नुकत्याच एका व्हिडिओने यांच्यामधले सत्य बाहेर काढले आहे.
भारतीय क्रिकेटर टीमचा फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांची नावे सतत जोडली जातात. दोघांनीही सोशल मीडियावरुन नाव न घेता एकमेकांवर टिका केल्या होत्या. त्यामुळे यांच्या चर्चांना उधान आले होते. मात्र, यांचे नाते खरे काय आहे हे भारताचा सलामवीर शुभमन गिल (Sbhman Gill) याने पसरलेल्या अफवांचा खुलासा केला आहे. शुभमन याने नुकतंच एका पंजाबी शोमध्ये हजेरी लावली होती, तेव्हा सुत्रसंचालक त्याला रिषभ पंतबद्दल प्रश्न विचारते आणि भुभमनही प्रशंसा करत अत्तर देतो.
शुभमनने दिलेल्या उत्तराची व्हिडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिमध्ये सुत्रसंचालक शुभमनला विचारते की, आजकाल रिषभ पंतला एका अभिनेत्रीच्या नावाने सतत चिडवले जाते, तर तुम्ही त्याला संघातही चिडवता का? यावर शुभमन सांगतो की, “नाही, त्याला आजिबात काही देणेघेणे नाही, कारण त्याला माहित आहे की, आपलं आणि तिचं काहीच नाही”, शुभमनच्या या उत्तरानंतर सुत्रसंचालकही जोरजोरात हसते.
Shubman Gill Nailed It https://t.co/XI1OkbW0iO
— Wasay Habib (@wwasay) November 19, 2022
शुभमनच्या अशा वक्तव्यानंतर व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच क्रेज मिळवली आहे. आता हे पाहाणे खूप रंजक ठरेल की, यानंतर उर्वशी कशाप्रकारे उत्तर देइल का? सगळ्यांनाच उर्वशीच्या उत्तराची उत्सुकता लागली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तबस्सुम यांच्या निधनानंतर बिग बी झाले भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
बाबाे! निर्मात्याने राहुल रॉयवर केला ‘हा’ माेठा आराेप, पाठवली कायदेशीर नाेटीस, वाचा सविस्तर