Wednesday, July 3, 2024

ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, उर्वशी रौतेलाने केलं ‘असं’ ट्वीट; आता करावा लागतोय ट्रोलिंगचा सामना

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये खेळताना दिसून येत आहे. आयपीएलमध्ये ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. ज्यामध्ये ऋषभ पंतच्या फलंदाजी आणि नेतृत्व कौशल्याचे कौतुक झालो होते. २३ वर्षीय ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या प्रेम प्रकरणाची चर्चा ही सोशल मीडियावर चांगलीच रंगलेली असते. या दोघांनी मात्र या चर्चांना दुजोरा दिला नसला, तरी दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. आता पुन्हा एकदा ऋषभ पंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या ट्वीटमुळे उर्वशीला चांगलच ट्रोल करण्यात आलं आहे.

भारताचा आघाडीचा फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत अल्पावधीतच भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख चेहरा बनला आहे. ४ ऑक्टोबर रोजी ऋषभ पंतचा वाढदिवस असतो. या निमित्त उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ऋषभला शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु यावेळी झालेल्या चुकीमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं. (rishabh pant team india wicketkeeper t20 world cup urvashi rautela trolled on social media)

महत्त्वाचे म्हणजे ऋषभ पंतचा वाढदिवस ४ ऑक्टोबरला होता. वाढदिवशी त्याला अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी उर्वशीनेही ऋषभला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु तिने चुकून एक दिवस उशिरा, म्हणजे ५ ऑक्टोबरच्या पहाटे शुभेच्छा दिल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केल आहे.

दरम्यान २०१९ मध्ये, ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला जुहूमधील एस्टेला हॉटेलमध्ये रात्री उशिरा डिनर करताना दिसून आले होते. तेव्हापासुन त्यांच्या प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली होती. परंतु त्यांनंतर ऋषभ आणि उर्वशी वेगळे झाले असून ऋषभने उर्वशीला ब्लॉक केल्याचीही माहिती समोर आली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उर्वशी रौतेला रस्त्यावर देत होती हटके पोझ, मात्र कॅमेऱ्यात अचानक कैद झाली ‘मोठ्ठी’ चूक

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

-उर्वशी रौतेलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, दोन आंतराराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

हे देखील वाचा