Monday, November 25, 2024
Home अन्य ‘आज भाऊला काय जेवायला मिळत नाही’, रितेश आणि जिनिलियाचा तो व्हिडिओ पाहून चाहत्याने केली कमेंट

‘आज भाऊला काय जेवायला मिळत नाही’, रितेश आणि जिनिलियाचा तो व्हिडिओ पाहून चाहत्याने केली कमेंट

बॉलिवूडमधील सगळ्यात रोमँटिक कपलचा जेव्हा उल्लेख होतो, तेव्हा सर्वात वर अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचे नाव येते. या रोमँटिक जोडीचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांवर प्रेम दाखवण्याची एक संधी ते दोघे सोडत नाही. अनेकवेळा त्यांच्यातील मजेशीर व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. अशातच त्यांचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे.

रितेश देशमुखने (ritiesh deshmukh) त्याची पत्नी जिनिलियासोबत (genelia deshmukh) एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ते दोघेही बसलेले असतात. यावेळी जिनिलीया तिच्या मोबाईलमध्ये बघत असते. ती व्हिडिओमध्ये म्हणते की, “माझ्या मोबाईलचे नेटवर्क खूप कमी आहे. यावेळी रितेश म्हणतो की, तुझ्या तोंडाला कनेक्ट कर.” यावर जिनिलियाची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे.

हा व्हिडिओ शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “कमी नेटवर्कसाठी उपाय.” त्यांचा या व्हिडिओवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “आज उपाशी राहणार वाटत भाऊ.” त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांचा हा अंदाज देखील भावला आहे. अनेकजण कमेंट करून त्यांचे कौतुक करत आहेत.

रितेश देशमुख हा मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठीमधील त्याचा ‘लय भारी’ हा चित्रपट खूप गाजला होता. प्रेक्षकांनी त्याचा या चित्रपटाला खूप प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील एका गाण्यात जिनिलीयाची एन्ट्री दाखवली होती. तिचा काही मिनिटाचा अभिनय देखील प्रेक्षकांना खूप आवडला होता.

हेही वाचा :

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा