Thursday, July 18, 2024

रितेश-जिनिलियाच्या ‘मिस्टर मम्मी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, कॉमेडी अशी की तुम्हीही व्हाल लोटपोट

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनिलिया डिसूझा(Genelia Dsouza) सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. तेरे नाल लव हो गया नंतर आता ते मिस्टर मम्मी या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ही जोडी चाहत्याना चक्क 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच रितेश-जिनिलियाने त्यांच्या ‘वेड’ या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाचे तीन पोस्टर शेअर केले होते. ज्यात रितेश दिग्दर्शकाचा भूमिकेत दिसेल. आता त्यांनी मिस्टर मम्मी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलरमध्ये पूर्ण धमाल आणि कॉमेडी पाहायला मिळत आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला रितेश त्याच्या त्रासामुळे डॉक्टरकडे जातो असे दाखवण्यात आले आहे. यादरम्यान एक महिलाही तेथे येते आणि ती गर्भधारणेशी संबंधित समस्या सांगते. नात्यातही या सगळ्या समस्या असल्याचं सांगतात. ज्यानंतर डॉक्टर महेश सांगतात की तू प्रेग्नंट आहेस, त्यानंतर गोष्ट पुढे सरकते, रितेश गरोदर होतो. ट्रेलर खूपच मजेशीर आहे. ट्रेलरमध्ये फनी कॉमेडी पाहायला मिळत आहे.

ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येईल की या सिनेमात रितेश-जिनिलिया यांच्यासोबत अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. महेश या सिनेमात एक डॉक्टर दाखवण्यात आले आहे. याशिवाय राकेश बेदीही या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. टी-सीरिज, शिवा अनंत आणि शाद अली यांची निर्मिती असणाऱ्या सिनेमाचे दिग्दर्शनही शाद अलीचे आहे.

मिस्टर मम्मीची कथा रितेश आणि जिनिलियाभोवती फिरते. मुलांबाबत दोघांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे, तर दोघीही गर्भवती होतात. पुरूष प्रेग्नंट झाला तर असं होतं, हे दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे, चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेशीर आहे. चित्रपटात रितेश पीटी शिक्षक आहे, तर जिनिलिया त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.

यादरम्यान मिस्टर मम्मी या चित्रपटावर कॉपी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अभिनेता केकेआर याने काही पोस्टर शेअर करत रितेशच्या या सिनेमावर गंभीर आरोप केलेत. त्याच्या म्हणण्यानुसार ज्युनिअर या हॉलिवूड चित्रपटाचे कॉपी तेलुगूमध्ये ‘मिस्टर प्रेग्नंट’ या चित्रपटाने केली आहे. तोच चित्रपट आता ‘मिस्टर मम्मी’ म्हणून बॉलिवूडमध्ये येत आहे. दरम्यान हा ट्रेलर पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांना अंकुश चौधरी स्टारर ‘इश्श्य’ या सिनेमाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 2006 साली हा सिनेमा आला होता ज्यात अंकुश चौधरी, भरत जाधव, विजय चव्हाण, श्वेता शिंदे अशी स्टारकास्ट होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दिल तो पागल है चित्रपटाला 25 वर्ष पुर्ण, यशराज फिल्मने शेअर केला व्हिडिओ
‘झलक दिखला जा’चा पावरफुल स्पर्धक गश्मीरने बोल्ड सीनवर केले मोठे वक्तव्य, जाणून घ्या एका क्लीकवर

हे देखील वाचा