Thursday, July 31, 2025
Home मराठी रितेश देशमुखलाही ‘पठाण’ चित्रपटाचं वेड; कौतुक करत म्हणला,’मी आधीच तिकीट बुक केलंय…’

रितेश देशमुखलाही ‘पठाण’ चित्रपटाचं वेड; कौतुक करत म्हणला,’मी आधीच तिकीट बुक केलंय…’

शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाची आतुरता अखेर संपली. बुधवार (दि, 25 जानेवीरी) रोजी पठाण प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चाहत्यांनी सिनेमागृहाच्या बाहेर राडा केला आहे. कोरोनानंतर पहिल्यांदा  चित्रपटासाठी चाहत्यांप्रती एवढी क्रेज पाहायला मिळत आहे. पठाणने प्रदर्शनापूर्वीच कोट्यावदीचा गल्ला जमवला आहे. भारतात जवळपास ८ लाखांपेक्षा अधिक तिकिटं बुक करण्यात आली आहेत. संपूर्ण देशभरात पठाण चित्रपटाचं वेड लागलं आहे. अशातच दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख याला देखिल पठाण चित्रपटने भुरळ घातली आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) तब्बल चार वर्षानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे त्यामुळे चाहत्यांप्रती शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहाण्याासाठी उत्सुकता कमालीची आहे. पठाण चित्रपट देशभरात अनेक सिनेमागृहात प्रदर्शत होणार असून चाहत्यांनी स्वागतासाठी ढोल-ताशा आणि फटाके वाजवून दणक्यात स्वागत केलं आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगनेच तब्बल 24 कोटींची कमाई करणारा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडीत काढणार असा अंदाजही दिसून येत आहे.

अशातच शाहरुखच्या पठाण चित्रपटासाठी महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh)  याने ट्वीट शेअर करत लिहिले की, “वादळ येत आहे. तुमचा सीटबेल्ट घट्ट बांधा. खूप दिवसांची प्रतीक्षा करायला लावली. शाहरुख खान तुला शुभेच्छा. पठाण चित्रपटाचं तिकीट मी आधीच बूक केलं आहे.” असं म्हणते त्याने शाहरुखचं कौतुक केलं असून चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याशिवाय अभिनेत्याने पठाण चित्रपटाचं पोस्टर देखिल शेअर केलं आहे.

नुकतंच रितेशच्या ‘वेड’ (Ved) चित्रपटाने  देखिल बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून तीन आठवड्यापर्यत चित्रपटाने सिनेमागृहात स्थान कायम ठेवलं आहे. त्याशिवाय मराठी इंडस्ट्रीमधील वेड चित्रपटाने नवा अनेक रोकॉर्ड मोडीत काढले असून सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटाच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. पठाण’मुळे रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाच्या कमाईला ब्रेक लागण्याची शक्यता चित्रपट तज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘काकू सारखी दिसते आता…’ ऐश्वर्या राय झाली ‘या’ कारणासाठी सोशल मीडियावर ट्रोल
फटाके अन् ढोल-ताशाच्या गजरात शहरुख खानच्या पठाण चित्रपटाचं दणक्यात स्वागत, पाहाच व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा