Wednesday, July 3, 2024

रितेश देशमुखने हटके अंदाजात दिल्या पुतणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा; गोड व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना आपल्याकडे आकर्षित करणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीतून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. रितेश सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याची तगडी फॅन फॉलोविंग आहे. त्याचे चाहते त्याच्या आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. तो देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडून असतो. अनेकवेळा तो त्याच्या परिवारासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकतेच रितेशने त्याची पुतणी दिवियाना हिचा वाढदिवस साजरा केला आहे. यातील एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रितेश देशमुखने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत त्याचा मोठा भाऊ धीरज देशमुख यांची मुलगी दिवियाना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकत की, रितेश दिवियानासोबत डान्स करताना दिसत आहे. यावेळी रितेशने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तसेच दिवियानाने गुलाबी रंगाचा फ्रॉक आणि डोक्यावर क्राऊन घातला आहे. (Riteish Deshmukh celebrate his Nephew Diviyanaa’s birthday, share a dance video on social media)

हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा प्रिय दिवियाना. तू खूप लवकर मोठी झालीस. तू माझे आणि संपूर्ण कुटुंबाचे हृदय आहेस. छोट्या परीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. याया आणि येसकडून खूप सारे प्रेम. गुलाबी हा माझा आवडता रंग आहे.” त्याच्या या पोस्टवरून हे लक्षात येते की, दिवियाना रितेशला याया आणि जेनेलियाला येस म्हणत असावी.

रितेश देशमुखने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘तुझे मेरी कसम’, ‘धमाल’, ‘हाऊसफुल’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘एक विलन’, ‘मस्ती’, ‘बाघी ३’ यांसारख्या चित्रपटात तो दिसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल

-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

-जिममध्ये ‘रफ ऍंड टफ’ वर्कआऊट करताना दिसली उर्वशी रौतेला; सौंदर्यातच नव्हे, तर फिटनेसमध्ये ही देते सर्वांना टक्कर

हे देखील वाचा