अभिनेत्री जेनेलिया डिसोझा-देशमुख तिचा पती अभिनेता रितेश देशमुखसोबत मजा-मस्ती करतानाचे व्हिडिओ सतत पोस्ट करत असते. हे मजेदार व्हिडिओ नेहमी चाहत्यांना खूप आवडतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला सोशल मीडियावर खूप प्रेम मिळते. या दिवसात त्यांचा असाच एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे पाहून चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
या व्हिडिओमध्ये, जेनेलिया तिची मैत्रिण कांची कौलसोबत दिसली आहे. यात त्या दोघीही मस्ती करताना पाहायला मिळाल्या. यात आपण पाहू शकतो की, जेनेलिया कधी खोलीच्या आत, तर कधी पायऱ्यांवर झाडू घेऊन नाचताना दिसली आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत जेनेलियाने लिहले आहे की, “जेव्हा वेडेपणा बर्याच प्रमाणात वाढतो. मला म्हणावे लागेल की, तू वेडीच नाही तर पार्टनर इन क्राइम देखील आहेस”. तसेच, व्हिडिओ शेअर करताना जेनेलियाने तिची मैत्रीण कांची कौललाही टॅग केले आहे.
जेनेलियाचा हा मजेदार व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे आणि ते यावर कमेंट्स करून प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखाहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. त्याचवेळी पती रितेश देशमुखनेही तिच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. रितेशने व्हिडिओवर फायर इमोजी पोस्ट केला आहे. ज्याला रिप्लाय देत जेनेलियाने लिहले की, “या क्रेझी व्हिडिओसाठी धन्यवाद.” अभिनेत्रीच्या या कमेंटवरून, हा व्हिडिओ रितेशने शूट केल्याचे समजते. याशिवाय इतर काही बॉलिवूड सेलेब्सनेही जेनेलियाच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे.
जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख यांनी 2012 मध्ये लग्न केले होते. 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली. जवळजवळ 9 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेनेलिया-रितेशला रियन आणि राहील देशमुख अशी दोन मुले आहेत.