बॉलिवूडचा प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी जोडून राहतो. तो केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नव्हे, तर त्याच्या वेगवेगळ्या फोटोजमुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. तो त्याची पत्नी जेनेलियासोबत अनेक रोमँटिक तसेच मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. नुकताच रितेशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो फिल्मफेअर पुरस्कार बघून त्याचे वेगवेगळे हावभाव देताना दिसत आहे. रितेशचा हा व्हिडिओ शो होस्ट करतानाचा आहे.
देशमुख देशमुखने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तो राजकुमार रावसोबत एँकरिंग करत आहे. त्यावेळी तो फिल्मफेअर पुरस्काराच्या ट्रॉफीकडे बघतो, आणि बघून अत्यंत मजेशीर एक्सप्रेशन्स देताना दिसत आहे. तसं बघायला गेलं तर रितेश देशमुख नेहमीच त्याच्या फनी अंदाजामुळे चर्चेत असतो. आहे फिल्मफेअर पुरस्कार 11 एप्रिलला टेलिकास्ट केला जाणार आहे.
नुकताच काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखने त्याची पत्नी जेनेलिया देशमुख सोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख हा त्याच्या पत्नीचे केस विंचरताना दिसत होता. जेनेलियाच्या हाताला दुखापत झालेली असल्याने, तो तिचे केस विंचरत होता. त्यांच्या या व्हिडिओला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद आला तसेच वेगवेगळ्या कमेंट्स देखील आल्या होत्या.
रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो शेवटचा ‘बागी 3’ या चित्रपटात दिसला होता. त्यात त्याने टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि अंकिता लोखंडे यांच्या सोबत काम केले होते. तसेच त्याने ‘मरजावा’ आणि ‘हाउसफुल 4’ या चित्रपटातही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साध्या कपड्यांमध्ये सारा अली खानने लावली स्टेजवर आग, पाहा साराचा बिंधास्त डान्स व्हिडिओ
-‘बेबी डॉल’ गाण्यावरील सनीचे ठुमके पाहिले का? मिळालेत ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज